जत,प्रतिनिधी : काही महिन्यापुर्वी झालेल्या दरिबडची ते पांढरेवाडी रस्त्याची दुरावस्था झाली आहे.जत ओढापात्रावर बांधण्यात आलेले सिडीवर्कही दर्जाहीन झाल्याने चार दिवसापुर्वी झालेल्या पावसामुळे आलेल्या पाण्यात या सिडीवर्कचा काही भाग वाहून गेला आहे.
दरिबडची ते सोरडीला जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गाचे काम अनेक दिवसाच्या मागणीनंतर दरिबडची कडून पांढरेवाडी पर्यतचे गेल्या दोन महिन्यापुर्वी भर पावसात डांबरीकरण करण्यात आले आहे.नुकत्याच झालेल्या पावसामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला असून शासनाचा लाखो रुपयाचा निधी वाया गेला आहे.
जत तालुक्यातील रस्ते कामाचा भष्ट,दर्जाहीन कामाचा उत्तम नमुना या रस्त्याच्या कामावरून स्पष्ट होत आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकामच्या नं 1 विभागाच्या अख्यत्यारित असलेल्या या रस्त्याचे अनेक ठिकाणचे डांबरीकरण गेल्या काही दिवसातील पावसाने वाहून गेले आहे.तर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
डांबरीकरण करताना साधे नियमही पाळण्यात आलेले नाही.थेट पावसात डांबरीकरण करत डांबरीकरणाचे नियम ढाब्यावर बसविले आहेत.ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मिलाफातून हा दर्जाहीन रस्त्याची दोन महिन्यात खड्डेमय रस्ता अशी अवस्था झाली आहे.बंधनकारक असणारा रस्ते कामाची माहिती देणारा फलकही या रस्त्यावर लावण्यात आलेला नाही.
अधिकाऱ्यांने ठेकेदाराला पाठिशी घातले
दरिबडची-पांढरेवाडी रस्त्याच्या भर पावसात सुरू असलेले काम बंद करावे,अशी मागणी दरिबडचीचे ग्रा.प.सदस्य अमोगसिध्द शेंडगे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती.मात्र बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.त्यामुळे ठेकेदारांने भर पावसात डांबरीकरण केले.परिणामी दोन महिन्यात रस्ता उखडू लागला आहे.काही ठिकाणी डांबर वाहून गेले आहे.तर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
अधिकाऱ्यांकडून वसूली करा
या रस्त्याचे डांबरीकरण, व ओढ्यावरील सिडीवर्क काम दर्जाहीन होत असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याला छुपा पांठिबा दिला आहे. त्यामुळे या रस्ते कामावर व्यर्थ गेलेला निधी अधिकाऱ्यांकडून वसूल करून पुन्हा दर्जेदार रस्ता करावा,अशी मागणी अमोगसिध्द शेंडगे यांनी केला आहे.
दरिबडची- पांढरेवाडी रस्ताची झालेली दुरावस्था