
जत,प्रतिनिधी : जत शहरात गेल्या काही दिवसापासून कोविड रूग्णाची संख्या वाढत असलेली दिसते.अशा रूग्णांच्या प्रमाणात जत शहरातील सरकारी रूग्णालयामध्ये बेड कमी पडत आहेत.त्यामुळे रूग्णांना नाईलाजाने खाजगी रूग्णालयात नेले जात आहे.
परंतू खाजगी रूग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. तसेच सरकारी रूग्णालयामध्ये सर्दी, खोकला झाला तरी त्यांना सांगली, मिरज येथे पाठवले जाते अशा वेळी खाजगी वाहन वाले रूग्णांना नेण्यास नकार देतात.अशा वेळी रूग्णांना अंब्युलन्स मध्ये नेले जाते. अंब्युलन्स मधून घेऊन जाताना रूग्णांना आपल्याला खरच मोठा आजार झाला आहे.आपण आता वाचत नाही असा धसका रूग्ण घेत आहे.त्यामुळे जत शहरातील मुस्लीम मदरसामध्ये अशा रूग्णांची सुविधा करण्यास आम्हास परवानगी मिळावी.
या कोविड सेंटर साठी आवश्यक असणारी व्हेंटीलेटर, ऑक्सिमीटर आदिची सोय आम्ही करण्यास तयार आहोत. तरी आम्हाला 100 रूग्णाचे कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी असे निवेदनात म्हटले आहे.अल्पसंख्यांक कल्याण समितीचे जिल्हा सदस्य सलीम गवंडी, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राज्यभाई नगराजी, मुस्लिम समाजाचे उपाध्यक्ष शफिक इनामदार, दादा प्रतिष्ठानचे सलीम पाचापुरे, हाजी इसाक नदाफ, हाजीअब्दुल गणी बागवान,हारुण इनामदार,अब्दुल जब्बार मुल्ला,रमजान डफेदार,आलम नदाफ, सिकंदर पखाली,अखिल नगराजी,अर्षद गवंडी,काशीम गवंडी आदी उपस्थित होते.



