जत,प्रतिनिधी : डफळापूर ता.जत येथील एका कापड व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.
पंधरा दिवसापुर्वी या व्यापाऱ्याचा अपघात झाला होता.
त्यादरम्यान उपचार सुरू असताना त्यांची प्रकृत्ती बिघडल्याने त्यांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते. व्यापाऱ्याचा शुक्रवारी मध्यरात्री मुत्यू झाला. शनीवारी सकाळी कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. डफळापूर येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
व्यापाऱ्याचा कुठे संपर्क आला,त्यांच्या संपर्कातील माहिती गोळा करण्याचे काम आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.अभिजीत चौथे यांनी दिली.





