पावसाने लावली रस्त्यांची वाट | वाहनधारक नागरिकांचे बेहाल ; अधिकारी,ठेकेदारांची आलीशान गाडीतून सवारी

0
4



जत,जत प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यात जून पासूून सुरू झालेल्या  पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या दोन महिन्यातील पावसानेे जत शहरासह गावागावातील अनेक रस्त्यांची वाट लावली आहे.शहरातील उपनगरामध्ये तर रस्ते कुठे व खड्डे कुठे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जतमधील वाहनधारक वैतागले आहेत.या 

रस्त्याची कामे दर्जेदार करून

घेण्याची जबाबदारी असलेले जतच्या सार्वजनिक बांधकाम विभाग एक व दोन अधिकारी व ठेकेदार आलिशान गाड्यातून रस्त्यावरून रपेट करत असल्याने त्यांनी केलेले रस्ते कसे आहेत हे त्यांना दिसत नाही.







त्यामुळे मुर्दाड अधिकारी,ठेकेदारा बरोबर मुर्दाड लोकप्रतिनिधी, जनता,वाहनधारकही सर्वकाही सोसून चिडीचूप आहेत.यथेच्छ शासनाचा निधी गिळकृत्त करण्याचा कार्यक्रम या साखळीतून दिवसाढवळ्या सुरू आहे.रॉकेल ओतून किंवा विना डांबर वापरता होणाऱ्या डांबरीकरण रस्त्याच्या तक्रारी आल्याशिवाय हे अधिकारी पाहणी करत नाहीत हे विशेष आहे.तालुक्याला बेजबाबदार अधिकाऱ्यांचे ग्रहण लागल्याने रस्त्याच्या दुरावस्थेचा मोठा फटका वाहन धारकासह नागरिकांना बसत आहे.गेल्या दोन महिन्यात सुरू पावसात काही डांबरीकरण रस्ते केले आहेत.दुर्देव्य म्हणजे त्यांवरचे डांबर पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहे.








त्यामुळे नेमके रस्ते डांबरीकरण केले का मुरमीकरण हा संशोधनाचा विषय आहे. सर्वाधिक बेजबाबदार बाब म्हणजे नव्याने केलेल्या सर्व रस्त्यावरून पाणी एकतरी वाहत असते किंवा थांबून राहत आहे.मुळात रस्ताच्या दोन्ही बाजूला उतार करण्याचाही विसर ठेकेदारांना पडला आहे हे विशेष..

महत्वाचे म्हणजे असे दर्जाहीन रस्ते करणारे ठेकेदार,त्यावर नियंत्रण असणारे अधिकारी 

 गेल्या दोन वर्षांत तालुका शहरातील मुख्य रस्त्यांची विशेष निधीतून डांबरीकरणाची कामे केलेली आहेत. जत शहरातील अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती.त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यांत केलेले डांबरीकरण पावसाने वाहून गेले आहे. जून महिन्याच्या शेवटच्या तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शहातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे.जत पेक्षा खेडेगाव बरे अशी अवस्था शहरात निर्माण झाली आहे.






मुख्य रस्त्यासह उपनगरांमध्ये वाहने चालविणे तर सोडा पायी चालणेही कठीण झाले आहे.अनेक रस्त्यांची नुकतीच डागडूजीसह नवे रस्ते देखील पावसाने धुऊन निघाली आहे. रस्त्यावर तर मोठ-मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचल्याने वाहने चलविणे जिकरीचे झाले आहे.ग्रामीण भागात पावसामुळे रस्ते धोकादायक झाले आहेत.

जत शहरातील

डांबरीकरणाचे रस्ते असे जलमय झाले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here