युवकांचे प्रेरणादायी नेतृत्व म्हणजेच उत्तमशेठ चव्हाण ; हेंमत खाडे

0करे अल्पज्ञानी बहु

     जसा निजनतेच्याअति खळखळाट॥

असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा।  विना नाद वाहे जशी गंगाधारा॥
     सामाजिक चळवळीत अनेक प्रकारचे नेते असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वहात अवघा महाराष्ट्र चिंब करणारा एक  नेता जर कोण असेल तर, ते राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष मा.उत्तमशेठ चव्हाण होय. 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे अत्यंत विश्वास समर्थक म्हणून उत्तमशेठ पुढे आलेले नेते आहेत.शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून उत्तमशेठ यांचे सर्वसामान्य,युवा वर्गात नावलौकिक मिळालेले आहे.

 सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्यसंपन्नता लाभलेले एक असामान्य भविष्यातील दमदार नेतृत्व म्हणून शेठकडे पाहिले जात आहे. व्यक्तीमत्वासाठी लागणार्‍या पट्टीतील या अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव,जनसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते नेते म्हणजे उत्तमशेठ होय.

   दुरदृष्टीने झपाटुन काम करणारं गतिमान नेतृत्व! त्यांच्यासोबत काम करतांना वेगळीच उर्जा मिळते. त्यांनी जेंव्हा पासुन युवा संघटनेची जबाबदारी स्विकारली आहे, त्या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व उत्तमशेठ यांच्यात पाहावयास मिळाले. शेठबरोबर काम करतांना अनेक अनुभव मिळाले, मार्गदर्शन मिळाले.नागरिक,युवकांच्या समस्या जाणणारा नेता म्हणून शेठचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. कोणतेही काम हातात घेतांना, सुरु करतांना होणारे फायदे-तोटे, दुरगामी परिणाम यांचा विचार करुन सखोल अभ्यास करुन कामास सुरुवात करण्याची खास हातोटी शेठकडे आहे. याचा अनुभव मी खुप जवळून घेतला आहे.


उत्तम शेठ चव्हाण यांचा जन्म दिनांक 15 ऑगस्ट, 1977 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका येथील घालवाड या छोट्याशा खेड्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला, मुळातच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आईवडिलांनी कसे बसे त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. 

उत्तमशेठ हे मुळातच जत तालुक्यातील तिप्पेहळळी येथील मूळ रहिवाशी आहेत, यांचे बालपण व शिक्षण हे घालवाड येथेच झाले, त्याचप्रमाणे ते अत्यंत उत्कृष्ठ खेळाडू म्हणून शालेय क्रीडा स्पर्धेत खोखो व कबड्डी या खेळांमध्ये नावाजलेले खेळाडू देखील होते, यांच्या महाविद्यालयीन काळातच शिरोळ तालुक्यातील काँग्रेसचे दिवंगत जेष्ठ नेते कै.रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कार्याचा बराचसा प्रभाव यांच्या मनावर पडला होता, पुढे उत्तमशेठ हे कै.रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून नावारूपाला आले, महाविद्यालयीन वयातच राजकीय नेतृत्वाच्या सानिध्यात राहत गेल्याने कायमच राजकिय डावपेच व नेतृत्व कौशल्य या गुणांनी निपुण होण्यासाठी जडणघडण आपसूकच घडत गेली,

कालांतराने आई वडिलांसोबत आपल्या मूळ गावी म्हणजेच जत तालुक्यातील तिप्पेहळळी येथे कायम वास्तव्यास स्थलांतरीत झाले.पुढे तिप्पेहळळी गावातच त्यांच्या अंतर्भूत आणणाऱ्या नेतृत्व गुणांनी पुढे येत गाव पातळीवरील राजकारणात सक्रिय सहभाग घेतला व कालांतराने सध्याचे विद्यमान पालकमंत्री व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ना.जयंतरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा उत्तमशेठ यांनी स्विकारली. तसेच आपल्या नेतृत्वातून जत शहर व तालुक्यात युवकांचं मोठं संघटन उभारून जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेबांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरून साहेबांचा विश्वास संपादन करण्याचे कार्य ते करत आहेत.आज तालुक्यातील ज्येष्ठापासून युवकांपर्यंत, तसेच नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांच्या मनात आपुलकीची व आपलेपणाची संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी वाटचाल देखील केली आणि अशीच यशस्वी वाटचाल चालू आहे.

मुळातच उत्तमशेठ यांचा स्वभावगुणच समाजसेवा व सामाजिक प्रश्नांबद्दल पुढाकार घेणारा आहे, कार्यकर्त्यांच्या व सामान्यांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये स्वतः लक्ष घालून ती अडचण दूर करणे हा एकच ध्यास ठेऊन आजवर उत्तमशेठ यांनी कार्य करत अनेक जनहिताची आंदोलने केलेली आहेत, युवकांसाठी प्रत्येक अडचणीत व कार्यात धावून जाणारे एक आदर्श व धडाडीचे नेतृत्व म्हणून आज उत्तमशेठ यांची तालुक्यात ओळख आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडत्या काळात पक्ष उभारणीसाठीचे मोलाचे कार्य फक्त उत्तमशेठ यांनीच केले आहे, त्यामुळे पालकमंत्री ना.पाटील साहेब यांच्याकडे उत्तमशेठ यांच्या शब्दांना मोलाचे स्थान देखील आहे. 

अशा कर्तव्यदक्ष व्यक्तीमहत्वाचा आज वाढदिवस त्यांना आभाळभर शुभेच्छा..

प्रतिक्रियातरुणाईला सक्षम करण्यासाठी धडपडणारा नेता


उत्तमशेठ चव्हाण व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन काम करणे. तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवून देणे ही त्यांची शैली आहे. आजवर त्यांनी युवकांना विश्वासात घेऊन सक्षम महाराष्ट्र कसा बनेल यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. आपला कार्यकर्ता आर्थिक सक्षम कसा घडला जाईल याचाच ते कायम विचार करत असतात. याच ध्येयातून ते आपला कार्यकर्ता घडवत आहेत. मग कोणाला रोजगार तर कोणाला स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांच्या पंखाला उडण्याचे बळ देण्याचे काम ते करत असतात.


– अशोक कोळी,

Rate Card

राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जिल्हा उपाध्यक्ष, सांगली
गरजवंतांना मदत करणारा नेता


उत्तमशेठ सोबत

काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मदतीकरता ते जात-भेद, धर्म-पंत, पक्ष असा कोणताही भेदभाव बाळगत नाहीत. ज्याला मदतीची गरज आहे त्याला ती अवश्य मिळावी, हा शेठ यांचा अट्टाहास कायम असतो. जो मदतीची मागणी करणार त्याला मदत निश्चित मिळणार.शेठसोबत मागील 8-9 वर्षापासून काम करत आहे. या युवा नेत्याच्या पाठीमागे तालुक्यातील जनतेने ठामपणे उभे राहायला हवे.


सतीश उर्फ पवन कोळी

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, तालुकाध्यक्ष,जत

तरुणाईचे आदर्श


तरुण नेता असूनही अल्पावधीत त्यांनी केलेल्या उत्तम कार्यामुळे आमच्यासारख्या तरुण पिढीसाठी ते एक आदर्श ठरले आहेत. त्यांचे असेच मार्गदर्शन मिळत राहावे. आई जगदंबे चरणी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.


– पंकज संकपाळ,

राष्ट्रवादी पदवीधर संघटना, जत शहराध्यक्ष

म्हणजे गरिबांचे कैवारी आहेत. गरिबांसाठी ते कायम झटत असतात. कोणताही भेदभाव त्यांच्यात नसतो. रिक्षा-टॅक्सी वाल्यांसारख्या गरिबांच्या मागे ते ठामपणे उभे असतात. त्यामुळे गरिबांना त्यांचा मोठा आधार आहे. मला विश्वास आहे हे गरीब लोक कायम त्यांच्या सोबत राहतील. त्यांचे विचार पुढे घेऊन जातील. ते गरिबांसाठी लढाई लढत आहेत, त्यामुळे येत्या काळात त्यांचे यश निश्चित आहे. यापुढेही त्यांनी असेच काम करत राहावे. ज्या पद्धतीने ते काम करत आहेत, त्यामुळे राज्याचा आणि देशाचा विकास निश्चित होणार. अशा लढाऊ बाण्याच्या व्यक्तीमहत्वामागे जनतेने मोठय़ा संख्येने उभे राहायला हवे.

शेठ आपणास वाढदिवसाच्या राष्ट्रवादीमय शुभेच्छा…


– हेमंत खाडे,जयंत भोसले

राष्ट्रवादी सदस्य

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.