जत,प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचारावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता साखर कारखान्याच्या भूमिपूजनाने करत आहोत.या कारखान्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग व जत तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.बेरोजगारीचाही प्रश्न निकालात निघेल,असा विश्वास राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त
केला.डफळापूर (ता. जत) येथील श्रीपती
शुगर अँड पॉवर लि. या साखर कारखान्याचा भूमिपूजन व बांधकामाचा प्रारंभ कर्नाटकचे वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील व कृषी राज्यमंत्री कदम यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याळीगिरी (ता. अथणी,कर्नाटक) येथेही बसवेश्वरा कारखाना युनिटचे बांधकाम सुरू करण्यात आले.
विश्वजित कदम म्हणाले, आगामी तीन महिन्यात बांधकाम पूर्ण करून दिवाळीत चाचणी हंगाम घेण्यात येणार आहे. कारखान्याची प्रतीदिवशी अडीच हजार टन गाळप क्षमता असून 15 मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्प येथे उभारण्यात येणार आहे. याशिवाय 30
केएलपीडी क्षमता असलेला डिस्टिलरी प्रकल्पही या ठिकाणी सुरू होईल.आमदार विक्रम सावंत यांनी
प्रास्ताविक केले.यावेळी आमदार मोहनराव कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पू बिराजदार,ऋषिकेश लाड, माजी सभापती बाबासाहेब कोडग, महादेव पाटील,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,बाबासाहेब माळी,अँड. युवराज निकम,अतुल मोरे, भूपेंद्र कांबळे उपस्थित होते.
डफळापूर येथील श्रीपती
शुगर अँड पॉवर लि. या साखर कारखान्याचा भूमिपूजन व बांधकामाचा प्रारंभ कर्नाटकचे वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील,आ.मोहनराव कदम कृषी राज्यमंत्री कदम,आ.विक्रमसिंह सांवत आदी