जत,प्रतिनिधी : जत शहरातील प्रभाग क्र.8 मधील ईदगाह रोड ते घाटगेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा पोलखोल समोर येताच संबधित यंत्रणेकडून पुन्हा नव्याने रस्त्याची दुरूस्ती केली आहे.
शहरातील महत्वाचा मार्ग असलेल्या ईदगाह रोड ते घाडगेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही दिवसापुर्वी करण्यात आले होते.
मात्र गेल्या महिन्याभरात पडत असलेल्या पावसात या रस्त्याच्या वरचे डांबर वाहून गेल्याने रस्त्यावरील मुरमीकरणाचे दगड वर्ती आले होते.एकाच पावसात या रस्त्याच्या कामाचा पोलखोल झाला होता.संबधित ठेकेदार,यावर लक्ष देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून बेजबाबदार व पैसे मिळविण्याच्या हिशोबाने काम केल्याचे आरोप परिसरातील नागरिकांनी केले होते.
निकृष्ट काम होत असतानाही संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उंटावरून शेळ्या राकण्याचा प्रकार या ठिकाणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.संकेत टाइम्सच्या बातमीच्या दणक्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर दगड झाकण्याचे काम झाले आहे.बघुया पुढे किती दिवस हे काम टिकणार आहे.
संकेत टाइम्स सामाजिक बांधिलकीचे आभार
जत तालुक्यात अगदी जनहिताच्या समस्येवर प्रखरपणे प्रकाशझोत टाकत त्या कामाचा पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे.आमच्या परिसरातील रस्त्याबाबतचा हा भष्ट्र कारभार संकेत टाइम्सने पुढे आणल्यानंतर या रस्त्याचे पुन्हा काम करण्यात आले आहे.समाजहितासाठी काम करणाऱ्या संकेत टाइम्स आम्ही ॠणी आहोत.
चंद्रकांत कुंभार,सामाजिक कार्यकर्ते
दैनिक संकेत टाइम्सच्या वृत्ताची दखल घेऊन ठेकेदाराने पावसामुळे उखडलेले ईदगाह रोड ते घाटगेवाडी या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण केले आहे.