जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मंडल अधिकारी,आर्थिक तडजोडीतून सातबारा बेकायदेशीर व चुकीच्या पध्दतीने नोंदी करून गरीब शेतकऱ्यांना लुटत आहेत.185 सारख्या शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेत लुटमार होत आहे.असे प्रकार बंद करावेत,अशी मागणी स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.तसे निवेदन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना देण्यात आले.
जत तालुक्यात पुन्हा नवे दोघेजण कोरोना बाधित | शेगाव,वळसंग मधील रुग्णांचा समावेश |
निवेदनात म्हटले आहे की, जत तालुका हा पिढ्यान,पिढ्या दुष्काळी तालुका आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.या अशिक्षीत व अज्ञानी फायदा घेत काही मोठे शेतकरी व दलाल आपल्या महसूल खात्यातील तलाठी, मंडळ अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरुन गोरगरीब शेतकरी यांच्या सातबारा सदरी चुकीच्या व बेकायदेशीर नोंदी करवून घेत असल्याचे आमच्या
निदर्शनास आले आहे. तसेच अशिक्षीत व अज्ञानी शेतकरी यांना चुकीच्या नोंदीची माहीती लागु दिली जात नाही. जर एखाद्या शेतकऱ्यास माहिती मिळाली आणि त्याने चौकशी केली तर त्याला उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. सर्व मंडळ अधिकारी, तलाठी,संबधीत विभागाचे अधिकारी यांना चुकीचे व बेकायदेशीर नोंदी सारखे धंदे बंद करण्याच्या सक्त सुचना द्याव्यात.
संखच्या राजारामबापू पाटील ज्यू कॉलेजचे बारावी परिक्षेत यशाची परंपरा कायम |
तसेच काही प्रकरणामध्ये अशा चुकीच्या नोंदी केलेल्या आहेत. त्या नोंदी रद्द करुन संबधीत शेतकऱ्यांना त्यांचे सातबारा रेकॉर्ड दुरुस्त करुन देण्याचे आदेश व्हावेत.असे प्रकार करणाऱ्या संबधीत कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.तसेच मंडळ निहाय व गांवनिहाय संबधीत गावचे सर्व सातबाराचे हस्तलिखीत सातबारा प्रमाणे जत ऑनलाईन सातबाराची तपासणी होऊन चुकीचे सातबारे तात्काळ दुरुस्त करण्याबाबत गांवनिहाय शिबीर / मेळावा घेण्यात याव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे.