संख,वार्ताहर : संख(ता.जत)येथील सर्व सेवा सोसायटी चेअरमनपदी राजेंद्र बसगोंडा पाटील,व्हाईस चेअरमन शरणाप्पा शिळीन यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक अधिकारी म्हणून एस.एस.शिंदे यांनी काम पाहिले.
संख सोसायटीचे संस्थेचे चेअरमन भाऊराया बिरादार व व्हाईस चेअरमन मैनुद्दीन जमादार यांनी निवडी पुर्व ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे.
हेही वाचा.
…त्या पाच मुत्यु प्रकरणाचा पुन्हा तपास होणार | विक्रम ढोणे यांचे उपोषण मागे : पोलिसाचे आश्वासन |
अडीच वर्षापुर्वी भाजपचे ताकवान नेते आर.के.पाटील यांच्या नेतृत्वाखाली पँनेलने सत्ता मिळविली होती.
दुसऱ्या टर्ममध्ये चेअरमन पदी राजेंद्र पाटील,व्हा.चेअरमन पदी शरणाप्पा शिळीन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सत्ताधारी माजी सभापती आर.के.पाटील गटाचे संचालक मंडळाचे 8 संचालक उपस्थित होते.निवडी नंतर आंंनदोत्सव साजरा करण्यात आला.
हेही वाचा.
यावेळी पँनेल प्रमुख माजी सभापती आर.के.पाटील,सरपंच मंगलताई पाटील,किरण पाटील,विजय पाटील,पाडोंझरीचे उपसरपंच नामदेव पुजारी,मावळते चेअरमन भाऊराया बिरादार,व्हाईस चेअरमन मैनुद्दीन जमादार,संचालक मल्लिकार्जुन बागेळी,सचिव मलगोंडा बिरादार,डॉ.सागर पाटील,निंगु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
संख सोसायटीच्या चेअरमन राजेंद्र पाटील, व्हा.चेअरमन शरणाप्पा शिळीन यांचा निवडनंतर सत्कार करण्यात आला.