प्रशिक्षणार्थी डिवायएसपी डॉ.निलेश पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0
2

जत,प्रतिनिधी : जत पोलीस ठाण्याचे  प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त जत पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शहरातील सार्वजनिक रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून मुजविण्याचे काम जत पोलीस ठाण्याचे डॉ.पालवे व कर्मचाऱ्यांनी केले. 




भगिनी निवेदिता प्रतिष्ठान येथील मुलींना शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.या उपक्रमा मध्ये सौ.पालवे मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते,विनोद कांबळे,पोलीस कर्मचारी उमर फकिर,सचिन जवंजाळ,अभिजित यमगर, रामेश्वर पाटील, प्रशांत गुरव, विजय अकुल, शितल चव्हाण,सुनील व्हनखंडे व  माजी नगरसेवक परशुराम मोरे आदीजण सहभागी झाले होते.



जत पोलीस ठाणे आवारात वृक्षारोपण करताना डॉ.निलेश पालवे व सौ.पालवे

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here