जत,वार्ताहर : जत शहरातील मोरे कॉलनी येथील दुय्यम निंबधक कार्यालया लगत असणाऱ्या वृध्द महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.या रुग्णाच्या संपर्कामुळे नवे दुय्यम निंबधक कार्यालयासह तालुका हादरला आहे.
मोरे कॉलनीतील राहणाऱ्या एका शिक्षिकांच्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.सदर महिलेची प्रकृत्ती बिघल्याने त्यांना मिरज येथे दाखल करण्यात आले होते.त्यावेळी त्यांच्या घेण्यात आलेल्या कोविड चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.सदर महिलेच्या घराशेजारीच नवीन दुय्यम निंबधक कार्यालय आहे.सदर महिलेच्या घरासमोर त्यांच्या मालकीचे किराणा दुकान व जनरल स्टोअर्स आहे.तेथे दुय्यम निंबधक कार्यालयात आलेले पक्षकारांची मोठी गर्दी असते.अनेक पक्षकार सदर दुकानासमोर बसतात.दुकानामधून चहा,मास्क,स्टेशनरी साहित्य,खाद्य पदार्थाची विक्री होत असते.त्यामुळे या दुकानाचा तालुक्यातील शेकडो लोकांशी संपर्क येतो.
सदर वृध्देची ट्रव्हल हिस्ट्री नाही.त्यामुळे कार्यालयात बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाची लागन झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.कोरोना बाधित महिलेच्या कुंटुबांतील अनेकजण दुकानात असतात.त्यांचा दुय्यम निंबधक कार्यालयात येणाऱ्या पक्षकार,कर्मचारी,स्टँपव्हेंडर यांच्याशी संपर्क येतो.त्यामुळे दुय्यम निंबधक विभागाशी संबधितामध्ये एकच खळबळ माजली आहे.
मागील महिन्यातच सदर कार्यालय येथे सुरू झाले आहे.या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची भिती व्यक्त होत होती.अखेर ही भिती खरी ठरली आहे.आता हा परिसर कंटेन्टमेट झोन होणार असल्याने दुय्यम निंबधक कार्यालय चौदा दिवस बंद राहणार काय,अशी शंका उपस्थित होत आहे.दरम्यान तालुक्यातील उमदी येथे दोन,निगडी खुर्दमध्ये दोन,धावडवाडीतील दोन,कोतेबोबलाद, गुलगुंजनाळ,जत मोरे कॉलनी येथील प्रत्येकी एक अशा नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले आहे.यात उमदी येथील दोन डॉक्टरांचा समावेश आहे.निगडी येथे हैंदाबादहून आलेले दोघे,धावडवाडी येथे पुणे येथून आलेले दोघे,उमदी येथील बाधित रुग्णांच्या संपर्कातील दोघे,कोतेंबोबलाद,गुलगुंजनाळ,
जत मोरे कॉलनी येथील प्रत्येकी एकजण अशा नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.उमदी व गुलगुंजनाळ येथील कोरोना बाधितावर उपचार केलेले डॉक्टर कोरोना बाधित आढळून आला आहे.यामुळे जत तालुक्यातील कोरोना बाधित संख्या 106 वर गेली आहे.सध्या तालुक्यातील 42 जण उपचार घेत आहे.आज अखेर 64 जण कोरोना मुक्त झाले आहे.
तर तिघाचा मुत्यू झाला आहे.पॉझिटिव्ह रुग्णापैंकी दोघाची प्रकृत्ती चिंताजनक आहे.सध्या 256 जण संस्था,होम कोरंटाईन करण्यात आले आहे.पुर्व भागात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत असल्याने
नागरिकांनी मास्कचा वापर,सोशल डिस्टसिंगचा वापर करावा,असे आवाहन अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांनी केली आहे.