निगडी बुद्रुक मधील पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारीची चोरी

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : निगडी बुद्रुक (ता. जत) येथे पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या दोन सबमर्सिबल मोटर, पीव्हीसी पाईप ,केबल, पेटी असे 46 हजार 500 रुपये किमतीच्या साहित्याची चोरी झाली आहे. ही चोरी गुरुवारी रात्री 11 वाजता ते शुक्रवारी सकाळी 6 वाजता या कालावधीत झाली आहे.याबाबतची फिर्याद सरपंच संजय धर्मांना चौके यांनी उमदी पोलिसात दिली आहे.

विक्रम ढोणेचे आमरण उपोषण सुरू | संशयास्पद खून प्रकरणाचे सीआयडीकडून तपास करण्याची मागणी |

याबाबत अधिक माहिती अशी, निगडी बुद्रुक ग्रामपंचायत च्या मालकीचे पाणीपुरवठा विहीर दोडनाला प्रकल्पा जवळ आहे. पाणीपुरवठा विहिरीलगत ग्रामपंचायतची खोली आहे. या खोलीत दोन सबमर्सिबल मोटर ,पीव्हीसी पाईप, केबल, पेटी असे साहित्य होते या साहित्याची चोरी अज्ञात चोराने गुरुवारी रात्री केली आहे सदरचा प्रकार शुक्रवारी सकाळी लक्षात आल्याने या बाबतची फिर्याद पोलिसात सरपंच चौके यांनी दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार भगवान कोळी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.