जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पश्चिम भाग वगळता पावसाने ओढ दिल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढली आहे.नऊ गावे व 81 वाड्या-वस्त्यांवर 11 टँकरद्वारे 20 हजार 886 नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे,अशी माहिती जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी दिली.
ते म्हणाले, अंकलगी,गोंधळेवाडी, सोन्याळ, माडग्याळ येथील गावांसह वाड्या-वस्त्यांवर,लमाणतांडा (दरीबडची),संखखालील वाडी-वस्ती, सोनलगी गावठाण व वाडी-वस्ती, खंडनाळ गावठाण व वाडीवस्ती,आवंढीखालील वाडी-वस्ती येथे टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.
जतेत जुगार अड्ड्यावर छापा | 13 जुगाऱ्यावर कारवाई
दरीबडची,बेळोंडगी,मानिकनाळ येथे पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे तेथील नागरिकांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा,अशी मागणी केली आहे. या गावांचे सर्वेक्षण व पाहणी करण्याचे आदेश ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर टँकरचा निर्णय घेतला जाणार आहे.पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या 11 टँकरपैकी 7 शासकीय व 4 खासगी टँकरचा समावेश आहे.9 गावांसाठी शासनाने 31 खेपा पाणी मंजूर केले आहे.
बिळूरमधील आणखीन तिघे कोरोना पॉझिटिव्ह | एक महिला,मुलगी,एका पुरूषाचा समावेश | बिळूरची संख्या 69 |
त्यापैकी सर्वच्या सर्व खेपांच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काहीवेळा टँकरच्या खेपा कमी होत आहेत.परंतु त्याचदिवशी तांत्रिक दोष दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. तीन गावात पाणीटंचाई जाणवत असली तरी, तेथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी विहीर व कूपनलिकांचे अधिग्रहण करून तेथील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांनी टॅकरची मागणी केल्यानंतर तात्काळ त्या भागाचे किंवा गावाचे सर्वेक्षण करून टँकर मंजुरीसाठी प्रयत्न केले जात आहेत.तालुका पातळीवर प्रांताधिकारी यांना टँकर मंजुरीचे अधिकार असल्यामुळे टँकर मंजूर करून पाणीपुरवठा करण्यात कोणतीही कसूर केली जात नाही, असेही धरणगुत्तीकर यांनी स्पष्ट केले.