ऐश्वर्या व आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण

0

मुंबई : फिल्मी जगतातील बिगबी अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता, त्यांची सून प्रसिध्द अभिनेत्री ऐश्वर्या आणि नात आराध्याही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.आता अमिताभ बच्चन,अभिषेक बच्चन यांना कोरोना झाल्याचे समोर आल्याने त्यांच्या कुंटुबियातील सर्वाची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यात ऐश्वर्या राय बच्चन आणि ऐश्वर्या अभिषेकची मुलगी आराध्याही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर जया बच्चन व इतर नातेवाईकांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याची

माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

Rate Card

दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ऐश्वर्या आणि आराध्या कोरोना पॉझिटिव्हच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.टोपेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, श्रीमती ऐश्वर्या राय बच्चन व कन्या आराध्या बच्चन या देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.तर त्यांचे जवळचे नातेवाईक व अभिताभ बच्चन यांच्या पत्नी श्रीमती जया बच्चन यांच्या कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.बच्चन कटुंबियांनी कोरोनातून लवकर बरे व्हावेत,त्यांची तब्येततं दुरुस्त व्हावी,अशा शुभेच्छा अनेक मान्यवरांनी दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.