जतेतील रस्ते पाण्यात | सार्वजनिक बांधकाम,नगरपरिषदेच्या रस्ते कामाचा पोलखोल

0
2

जत,प्रतिनिधी  :जत शहरात बुधवार ता.8 रोजी पडलेल्या धुवाधार पाऊसाने रस्ते नाले बनविले.शहरातील चर्चेत असलेल्या विजापूर-गुहागर मार्गावर पाऊसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागल्याने वाहन धारकांसह नागरिकांचे बेहाल झाले.शहरात बुधवारी आतापर्यतचा मोठा पाऊस झाला.नगरपरिषदेच्या रस्त्याचे सत्य या पाऊसाने उजेडात आणलेच.शहरातील प्रमुख मार्गासह अनेक अतर्गंत मार्ग पाणीमय झाले होते.रस्त्यावरून वाहणारे पाणी काही समतल भागात थांबून गुडघाभर पाण्याची डबकी बनली होती.तर रस्त्यावरील खड्ड्यांनी पुर्ती वाट लावल्याचे चित्र होते.

दुपार तीनच्या सुमारास आलेल्या पावसाने शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व नगरपरिषदेच्या रस्ते कामाचे सत्य समोर आणले.कसेबसे डांबराचे थर मारून चकाचक केलेले अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.कुठेही रस्त्यावरील पाणी बाजूला जाण्यासाठी चरी खोदल्या नसल्याने पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते.गेल्या दोन महिन्यापुर्वी झालेले सार्वजनिक बाधकांम विभागापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जत पोलीस ठाण्यासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्याची मालिका तयार झाली आहे.जवळपास दोन दोन फुटापर्यत खड्डे पडल्याने दुचाकी,लहान वाहन धारकांचे हाल झाले.अनेक वाहने या खड्ड्यात आदळल्याने नुकसानग्रस्त झाले आहेत.पोलीस ठाणे ते संभाजी कार्नरपर्यतचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा तर संभाजी चौक ते आरळी कार्नर पर्यतचा रस्ता खड्ड्यामुळे नालेमय झाला होता.या रस्त्यावरून जाणारा प्रत्येक जण बांधकाम विभाग व नगरपरिषद प्रशासनाच्या नावाने बोटे मोडून जात होता.तर शहरातील नव्याने झालेल्या रस्त्याची वाताहात नगरपरिषद पदाधिकारी,प्रशासनाला पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत.

सर्वजण मिळून खाऊमुळे रस्त्याची वाट

शहरातील सार्वजनिक बांधकाम व नगरपरिषदेच्या ताब्यातील रस्त्याच्या कामे अनेक वेळा झाली आहेत.मोठ्या निधीचा खर्च काही अपवाद रस्ते वगळता वाया गेल्याचे आरोप आहेत.सर्वजण मिळून खाऊ धोरणामुळे रस्त्याची वाट लागली आहे.

जत शहरातील विजापूर-गुहागर व कवटेमहांकाळ -जत रस्ताची आवस्था

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here