आंवढीतील सुधाकर बाबर यांचे कार्य आदर्शवत ; तहसीलदार सचिन पाटील | गावातील 500 कुंटुबांना धान्याची मदत

0
3

आंवढी,वार्ताहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवंढी सुपुत्र तथा सध्या मुंबई येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या सोहम हॉलिडेजचे मालक सुधाकर रावसाहेब बाबर यांनी  जुलै महिन्याच्या रेशन दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या सर्व रेशनकार्ड धारक सुमारे 500 कुंटुबियांना मोफत हे धान्य वाटप करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.सध्या कोरोनाच्या अडचणीतील ग्रामस्थांना या मदतीची मोठी मदत होणार आहे. सुधाकर बाबर यांचे कार्य आदर्शवत आहे,अशा पध्दतीने तालुक्यातील व्यवसायिकांनी योगदान द्यावे, असे प्रतिपादन तहसिलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

तहसीलदार पाटील,प्रसिद्ध स्ञीरोग तज्ञ डॉ.रोहन मोदी,बाबर यांच्या मातोश्री 

कालाबाई बाबर यांच्याहस्ते हे धान्य वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे रोजगार,शेतीसह ग्रामीण भागातील कुंटुबे मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत.त्यांना मदत करण्याचा विढा सुधाकर बाबर यांनी घेतला आहे.बाबर यांनी जूलै महिन्यात गावात वाटप करण्यात येणाऱ्या 500 कुंटुबियांचे पैसे स्व:ता भरत त्यांना धान्ये मोफत दिले आहेत.

यापूर्वीही बाबर यांनी गत जून महिन्यात गावातील 150 कुटुंबातील 450 नागरिकांना रेशनचा गहू,तांदूळ मोफत दिला होता.कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणून काम करत असलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना एन 95 मास्कचे वाटप केले आहे.

 कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे 

आवंढी गावात कोरोनाचे चार रुग्ण सापडल्याने गाव 28 दिवस कंटेंनमेंट झोन मध्ये होते. गावातील मजूर,हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील लोकांच्या हाताला काम नव्हते,लोकांना रोजगारासाठी गावाबाहेर जाता येत नव्हते.त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकी जपत बाबर यांनी हे कार्य सुरू केले आहे.

याप्रसंगी सरपंच आण्णासाहेब कोडग,उपसरपंच आण्णासाहेब बाबर,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शीतल शिंदे,रेशन दुकानदार पोपट चव्हाण,माणिक श्रीमंत कोडग,बबन कोडग,हायस्कूलचे चेअरमन वसंत कोडग,भास्कर कोडग,नारायण कुंभार,हिम्मत कोडग,रामचंद्र कोडग,विनोद कोडग,अंतोष सोळगे, राजाराम कोडग,ग्रा.प.कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आंवढी येथे धान्याचे वाटप करताना तहसीलदार सचिन पाटील, डॉ.रोहन मोदी,कालाबाई बाबर 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here