संख,वार्ताहर : जत तालुक्यातील पुर्व भागातील लमाणतांडा(दरिबडची)व मुळ संखचा मात्र सध्या जाड्डरबोबलाद येथे आरोग्य अधिकारी असणाऱ्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे पुर्व भागात कोरोनाचा प्रवेश झाल्याचे समोर येत आहे.
लमाणतांडा येथे सांगलीहून आलेल्या व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने संख येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यात आले होते.मात्र त्यांची लक्षणे संशयास्पद वाटल्याने त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
संख येथे आरोग्य अधिकारी असणारा मुळ संखचा मात्र सध्या जाड्डरबोबलाद येथे कार्यरत असलेला व्यक्ती कोरोना बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान दोन्ही रुग्ण सापडलेल्या गावात
प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील, बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर, संखचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत बुरकूले यांनी भेट देत गावात उपाययोजना सुरू केल्या आहेत.बाधित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील लोंकाना जत येथे संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर लांबच्या संपर्कातील लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. संखमधील खाजगी दवाखाना बंद करण्यात आला आहे. दोन्ही गावात रुग्ण सापडलेला परिसर सील केला आहे.दरम्यान लमाणतांडा दरिबडची येथील बाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील सहा जणांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
लमाणतांडा(दरिबडची)येथे तालुका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.