जत,प्रतिनिधी : लॉकडाऊन नंतर रुळावर येणारे ग्रामीण अर्थकारण काही अतिउत्साही लोकप्रतिनिधी व व्यवसायिकामुळे बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एकीकडे मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी कोठेही लॉकडाऊन नाही,असे सांगत असताना जत तालुक्यातील शहरासह अनेक गावे लॉकडाऊन करण्याचा घाट घातला आहे.तो हातावर पोट असणाऱ्या व सामान्य जनतेच्या अडचणीचे ठरणारे आहे,त्यामुळे प्रशासनाने बंद बाबत वस्तूनिष्ठ निर्णय घ्यावा,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.
प्रत्यक्षात बिळूर किंबहुना जेथे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.ती गावे बंद करण्यात येतात.तेथे कंन्टेनमेट झोन करण्यात आले आहेत.त्यामुळे तेथील नागरिकांनी गावाबाहेर जायाचे नाही.असे आदेश आहेत.तेथून काही लोक बाहेर येतात कसे,व त्यांचा इतर गावात वावर कसा वाढला याबाबत कोणाचे अपयश म्हणाये,तर कोरोना बाधित गावातून नागरिकांचा वावर वाढल्याने कोरोना होणार हा निष्कर्ष काढण्याचे घाईचे ठरत आहे.त्यापलिकडे बंद नंतर पुन्हा बाजार पेठ गर्दीचा उच्चांक गाठणार हे अनेकवेळा समोर आले आहे. चालू स्थितीत सोशल डिस्टसिंग पाळून दुकाने चालू ठेवण्याचे ग्राहकांसह,दुकानदाराचे कर्तव्य आहे.त्यावर प्रशासनाचे नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.तरीही बाजार पेठेतील गर्दी,सोशल डिस्टसिंगचा फज्जा हे कुणाचे अपयश म्हणायचे.
बंदच्या नावावर मालाचा तुटवडा करून 30 ते 50 टक्क्यापर्यत दर वाढवून जनतेवर लादणाऱ्या प्रवृत्तीला खतपाणी घालायचे काय ? असे अनेक प्रश्न या बेकायदेशीर बंदमुळे उपस्थित होत आहेत.जिल्हा प्रशासनाच्या आदेशाकडून दुर्लक्ष करून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार थांबवावेत.बंदचा फटका अर्थव्यवस्था,हातावरचे पोट असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना बसणार आहे.
कोरोनाला हरवायचे आहेच,परंतु त्यासाठी जनतेला वेदना देऊ नयेत,याबाबत प्रशासनातील तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी गावातील प्रमुख आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे.अन्यथा विनाकारण ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडू शकते,असेही ढोणे म्हणाले.