खोटे मेसेज प्रकरणी सायबर क्राईम पोलीसांना कारवाईच्या सुचना

0

सांगली : जिल्हाधिकारी सांगली व जिल्हा माहिती कार्यालय सांगली यांच्या नावाने खोटे व बोगस संदेश तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात सांगली सायबर क्राईमकडे तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची ची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की की गेली काही दिवस व्हाट्सअप फेसबुक आधी सोशल मीडियावर जिल्हाधिकारी सांगली व जिल्हा माहिती कार्यालय सांगली यांच्या नावाने बोगस संदेश फिरत आहेत. चुकीची माहिती देणारे हे आवाहन करणारे संदेश व्हायरल होत आहेत. चिकन मटण घेणे बंद करा वृत्तपत्रे घरात घेऊ नका असे चुकीचे व खोटे आवाहन करण्यात येत आहे .अशा प्रकारचे कोणतेही आव्हान जिल्हाधिकारी अथवा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी असे शासकीय अधिकारी व कार्यालयाच्या नावाने असणारे संदेश, आवाहन कोणतीही खात्री न करता पुढे पाठवू नयेत. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधावा. अशा खोट्या अफवा पसरणे खोटी माहिती पसरवणे हा गुन्हा असून सायबर क्राईम पोलीस अशा घटनांवर लक्ष ठेवून आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. तरी कोणीही ही नागरिक व वाचक यांनी अशा खोट्या प्रचाराला बळी पडून घाईने काहीही निर्णय घेऊ नयेत असे आवाहन करण्यात येत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.