माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ (ता.जत) येथील उमदी पोलीस ठाण्यातील हद्दीतील माडग्याळ येथे नाकाबंदी करून मास्क न वापरणे व डबल मोटारसायकल बसून दुचाकीवरून फिरणाऱ्या लोकांवर माडग्याळ येथे कारवाई करण्यात आली.
आणि विनामास्क फिरणाऱ्या लोकांना 9 केसेस व मोटारसायकल 40 केसेस 8000 हजार रुपये दड आकारण्यात आले.400 वाहनांवर कारवाई करण्यात आली.तसेच रस्त्यावर थुकंणे मावा, गुटखा,5 केसेस असे रीतीने 1000 हजार रुपये दंड आकारण्यात आला. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिलेल्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाणे हद्दीतील माडग्याळ येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी माडग्याळ गाव शुक्रवारी लाँकडाऊन करण्यात आली व तसेच उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माडग्याळ या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.
यावेळी उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर म्हणाले,लोक नियामांचे उलघंन करत आहेत.कोरोनाच्या पाश्याभूमीवर विनाकारण दुचाकीवरून फिरत आहेत . आणि विनामास्क न वापरणाऱ्या कारवाई करण्यात आली.सध्याच्या कालावधीत मास्क वापरणे बंधनकारक आहे.असे असताना देखील काही लोक विनामास्क फिरतात त्यांच्या वर 188 प्रमाणे एकूण 18 खटले कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आहे . तसेच जे लोक सार्वजनिक धुप्रमान करून जमिनीवर थुंकतात अशा लोकांवर कारवाई करण्यात आली आली. 200 प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे.बाहेर फिरताना दरोरोज मास्क वापरा मोटारसायकल डबल फिरू नये. आवश्यक कारणासाठी बाहेर पडावे विना आवश्यक बाहेर पडू नये किंवा धुप्रमान सुध्दा करू नये.अशा नियामांचे पालन करावे आणि पोलीस प्रशानास सहकार्य करावे असे यावेळी आव्हान करण्यात आले.