जतेत कंत्राटदाराचं चांगभलं | टक्केवारीच्या नादात ‘रस्तेकामा’चा बट्ट्याबोळ

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या भोंगळ व ढिसाळ कारभारामुळे जत शहरवासिय त्रस्त झाले असून जत नगरपरिषदेचा कारभार म्हणजे अंधेरी नगरी चौपट राजा असा झाला आहे. 

Rate Card

जत नगरपरिषदेच्या सत्ताधारी व विरोधी नगरसेवकामध्ये वारंवार नगरपरिषदेच्या मासिक बैठकित वाद व हानामारी होत असल्याने या पालिकेला जनतेच्या विकासाचे काहीही देणेघेणे नाही.जत शहरातील अनेक समस्याकडे जत नगरपरिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.जत शहरातील नुकतेच डांबरीकरण झालेले सर्वच्या सर्व रस्ते हे निकृष्ठ व दर्जा हिन असे करण्यात आले आहेत.या रस्त्यावर कमी प्रमाणात डांबर ओतल्याने हे रस्ते जास्त काळ टिकणारे नाहीत.जत शहरातील नगरपरिषदेअंतर्गत रस्त्याचे कामाची सुरुवात करते वेळी सबंधित रस्त्याचे संपूर्ण कामाच्या माहीतीचा कामाचे स्वरूप दर्शवनारा मार्गदर्शक बोर्ड सबंधित ठेकेदाराने कामाचे सकृतदर्शनी जागेवर लावणे बंधनकारक असताना ही जत शहरात नगरपरिषदेचे माध्यमातून जेवढी रस्त्याची कामे करण्यात आली आहेत. त्या एकाही कामाचे ठिकाणी कामाची संपूर्ण माहिती दर्शविणारा फलक लावलेला नाही. यावरूनच जत नगरपरिषदेचा कारभार किती पारदर्शक व चांगला चालला आहे हे दिसून येते.जत शहरात गेल्या महिन्याभरात जत नगरपरिषदेचे हद्दीतील रस्त्याची खडीकरण व डांबरीकरण ची कामे करण्यात आली आहेत.ही कामे सुरू असताना कामाच्या ठिकाणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, नगरपरिषदेकडील अभियंता  सबंधित प्रभागाचे नगरसेवक यांनी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून ही कामे कशी  चांगल्या प्रकारे करता येतील हे पहाणे त्यांचे कर्तव्य असताना ही त्यांनी आपल्या कर्तव्याकडे केवळ ठेकेदाराकडून मिळणारे मलिद्यापोटी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

जत शहरात चालू असलेली रस्त्याची कामे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.