आंवढी,वार्ताहर : आवंढी, लोहगाव,सिंगनहळ्ळी या गावांना म्हैसाळ योजनेतून लवकरात लवकर पाणी देण्याचा प्रयत्न करण्याच्या सुचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत,जत तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या पर्यंत सिंचन योजनेतू पाणी पोहचविण्याचे माझे स्वप्न आह,ते पुर्ण करण्यासाठी मी सर्वोत्तरी प्रयत्न करत असल्याचे मत आ.विक्रमसिंह सांवत यांनी व्यक्त केले.
आमदार सावंत यांनी आंवढी लोहगाव,सिंगनहळ्ळी गावांना पाणी पोहचविण्याच्या बंधिस्त पाईपलाईनची पाहणी केली.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, म्हैसाळ योजनेचे शाखा अंभियते अभिमन्यू मासाळ,श्री.चोपडे,श्री. मिरजकर,माजी उपसरपंच डॉ.प्रदिप कोडग,सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश सोळगे,सुरेश कोडग,सतिश कोडग,रामचंद्र कोडग,मोकाशेवाडीचे सरपंच आण्णासाहेब गायकवाड,सिंगनहळ्ळीचे सरपंच महादेव हिप्परकर,बलभिम हिप्परकर,लोहगावचे सरपंच सौ.बालिका काशीद,माजी चेअरमन समाधान काशीद, माजी सरपंच लक्ष्मण कोळेकर, वसंत काशीद, सचिन पाटील,माजी चेअरमन बबन बोरगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.सांवत यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत संवाद साधला.पाईपलाईन कामाच्या अडचणी तातडीने सोडविण्यात या योजनेचे काम गतीने पुर्ण करा,पुढील आवर्तनात पाणी सोडण्याचे नियोजन करा,असे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना आ.सांवत यांनी दिले.
आंवढी,लोहगाव,शिंगनहळ्ळी परिसरात पाणी सोडण्याच्या बंधिस्त पाईपलाईनची आ.विक्रमसिंह सांवत यांनी पाहणी केली.