जत,प्रतिनिधी : तीन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे अँनलॉक मध्ये जिल्ह्यात एसटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.त्यामुळे जत बसस्थानकात काही प्रमाणात प्रवाशाची गर्दी होऊ लागली आहे.
जत आगारातून सध्या जत-सांगली,जत-उमदी,जत-संख या मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत.पहिल्या आठवडत अल्प प्रतिसाद लाभल्यानंतर गेल्या काही दिवसापासून प्रवाशी वाढताना दिसत आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या बसेसमध्येही खबरदारी घेण्यात येत आहेत. त्यामुळे बसमध्ये एका सीटवर एकच प्रवाशी बसवीण्यास मूभा देण्यात आली आहे.
कायम मोकळ्या बसेस रावत असताना
शुक्रवारी बसस्थानकात प्रवाशाची लॉकडाऊन काळातील सर्वाधिक प्रवासी संख्या दिसून आली.
जत बसस्थानकात प्रवाशाची गर्दी वाढू लागली.