जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथे एकाजणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर यांनी दिली.
मुळ बिळूरचा असलेला हा रुग्णाला त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.मात्र त्याची प्रकृत्ती बिघडल्याने त्याला सांगली येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.तेथेही त्यांची प्रकृत्ती खालावू लागल्यानंतर त्यांची कोरोना तपासणीसाठी स्वाब घेण्यात आले होते.त्यांचा रिपोर्ट बुधवारी आला.
दरम्यान रिपोर्ट मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी संकपाळ यांनी तातडीने बिळूरला भेट दिली आहे. सध्या बाधित रूग्ण कुणाच्या संपर्कात आला होता.व पुढे त्यांचा किती जणाची संपर्क आला यांची माहिती संकलित करण्यात येत असल्याचे डॉ.बंडगर यांनी सांगितले.
निगडी खुर्द येथील एका रूग्णानंतर अनेक दिवसानंतर जत तालुक्यात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने काहीसी ढिल्ली पडलेली यंत्रणा सतर्क झाली आहे.