आवंढी,वार्ताहर : आवंढी (ता.जत) येथील दोघेजण सख्ये भाऊ कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. ते गावात येताच आवंढी ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून भर पाऊसात त्यांचा पेढा भरवत व पुष्पवृष्टी करून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
ते दोघेजण मुबंई हुन आले असल्याने त्यांना संस्था कोरोटाईन करण्यात आले होते.त्यानंतर त्यांची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर लगेच त्यांना कोव्हीड केअर सेंटरला हलविण्यात आले व त्याठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या टीमने योग्य उपचार करून त्यांना कोरोना मुक्त करण्यात यश मिळवले.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून सर्वजण परिश्रम घेत आहेत. त्यांनी सर्व प्रशासनाचे आभार मानले सांगली जिल्ह्यातील तेथे उपचार घेत असलेले सर्व कोरोना रुग्ण आमच्या प्रमाणेच लवकर बरे होऊन कोरोना मुक्त होतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.आवंढी गावातील नागरिकांनी आपल्या मायभूमीत जल्लोत केलेल्या स्वागताने दोन्ही बंधू भारावून गेले व सर्व गावकऱ्यांच्या आशीर्वादाने आम्ही घरी सुखरूप आलो अशी भावना व्यक्त करून गावकऱ्यांचे आभार मानले.
यावेळी सरपंच आण्णासाहेब कोडग ,उपसरपंच आण्णासाहेब बाबर ,ग्रा.प.सदस्य,ग्रा.प. कर्मचारी,आरोग्य सेविका,आशा सेविका,गावातील ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्या दोन सख्या भावाचे जंगी स्वागत करण्यात आले.