अंकलेतील कोरोना बाधिताच्या संपर्कातील 22 जणांची कोरोना तपासणी होणार | दोन्ही गावात खबरदारी

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील अंकले येथे कोरोना बाधित रुग्ण सापडताच प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. रुग्णाच्या संपर्कातील बाजमधिल 12 तर अंकलेतील 10 जणांना संस्था क्वारंनटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यां सर्वाचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत,अशी माहिती गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी दिली.
सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. संसर्ग रोकण्यासाठी आमची पथके तैनात करण्यात आल्याचेही धरणगुत्तीकर यांनी सांगितले.