सांगली जिल्ह्यात आज दुपारी 12 पर्यंत दोन रुग्ण कोरोनाबाधित | आंवढीचा 55 वर्षीय कोरोना बाधित इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर |

0
6

सद्यस्थितीत उपचाराखाली 52 रूग्ण : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 

सांगली : सांगली जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत दोन रुग्ण कोरोणाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 52 झाली आहे. आज अखेर 68 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 124 रुग्ण कोरोणाबाधित ठरले आहेत. कोरोना बाधित रुग्णांपैकी एका रुग्णांची स्थिती चिंताजनक असून तिघांची स्थिती स्थीर आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

आज कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील झरे येथील 58 वर्षाची महिला पॉझिटीव्ह आली असून सदर महिला दि. 26 मे रोजी मुंबईहून आली होती. या महिलेस अगोदरपासूनच मधूमेह, उच्चरक्तदाब, थायरॉईडचा विकार (हायपोथायरॉईडीजम) हे विकार आहेत. तसेच जत तालुक्यातील खलाटी येथील 60 वर्षाचा पुरूष कोलकत्ता, नागपूर, पूणे येथून प्रवास करून आलेला असून तो पॉझिटीव्ह आला आहे. 

पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी औंढी तालुका जत  येथील 55 वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. कडेबिसरी (सांगोला, सोलापूर) येथील 48 वर्षाच्या पुरूष रूग्णाला ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. खिरवडे (शिराळा) येथील 56 वर्षाच्या पुरूष रूग्णावर सद्यस्थितीत नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. मणदुर (शिराळा) येथील 81 वर्षाच्या पुरूष रूग्णास नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला असून रूग्णाची स्थिती स्थीर आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here