आंवढीतील 18 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

0

जत,प्रतिनिधी : आंवढी ता.जत येथे मुंबईहून आलेल्या तिघा कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्काती आलेल्या 19 जणापैंकी 18 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Rate Card

आंवढीत मुंबईहून आलेले दोघे तरूण भाऊ,व एक साठ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले होते.त्यांच्या संपर्कात आलेले आंवढी व शेगाव येथील एकूण 19 जणाचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.त्यातील एकजणाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बाकीचे 18 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.