प्रज्ञावंत राजकारणी | सुजय उर्फ नाना शिंदे

0
1

सुजय उर्फ नाना यांचे जीवन निर्णायक वळणांची स्थित्यंराची तेजस्वी कहाणी आहे. कर्तृत्वाच्या गगनात स्वच्छंदरित्या विहार करणारे नाना आपल्या अंगबळावर समाजविकास कार्याचा व रचनात्मक परिवर्तनाचा रथ काही योजनेपुढे ओढून नेऊ पाहतायेत.आयुुष्यातील प्रत्येक पाऊल हे टाकताना 

आव्हान वाटते. मात्र आव्हानाला बुध्दिमतेची आणि आत्मविश्वासाची जोड दिली की प्रत्येक आव्हानावर मात करणे कठीण नसते. हे कर्तृत्वातून आणि नेतृत्वातून शिकायला मिळते हे नानाजीच्या कर्तृत्वा वरून सिध्द होते. 

कर्तृत्वदक्ष प्रशासक संयमी वक्तृत्व,नितीसंपन्न ग्रहस्थ व मातृपितृ भक्त पुत्र हे नाना शिंदेचे व्यक्तिमहत्वाचे काही ठळक पैलू,जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, सांगली बाजार समितीचे सभापती स्वर्गिय अशोक शिंदे यांचे जेष्ठ चिंरजिव,तालुक्यातील तत्कालीन व्यक्तिमहत्व बि.आर.काका यांचे नातू व जत तालुक्यातील दोन ताकतवान नेत्याच्या प्रज्ञेने,वृत्तीने व विचारांनी स्वंतत्र होते.आपली बुध्दिमता,कार्यक्षमता,व नितीमता यावर अढळ विश्वास असणाऱ्या नानाना कोणाच्या ओंजळीचे पाणी पिणे कधी जमले नाही.जतमध्ये शिक्षण, पदवी प्राप्त केली.व आकस्मित पणे त्यांना राजकारणात याव लागलं,पहिल्याच जत ग्रामपंचायत निवडणूकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले,त्यापुढे नगरपरिषदेच्या अहिल्या निवडणूकीत स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 

त्या संधीचे सोने करत त्यांनी जतच्या विकासात आमुग्राल बदल घडविताना नियोजन बंध्द विकास कामे आखून मार्गी लावली. सामान्य जनतेचा सामान्य नेता अशी ओंळख त्यांवेळी नानाजीनी निर्माण केली, ती आजही कायम आहे. अगदी लहान वयात लोकनेते बि.आर.काका,स्व.अशोक दादा यांच्या छत्रछायेखाली जडणघडण झालेल्या नानाजी यांनी राजकारणात मोठे वलंय निर्माण केले आहे.लोकनेते अशोक दादांच्या आकस्मित निधनाने डळमळीत न होता दादाचा आदर्श वारसा कायम ठेवला आहे. खरेतर उच्च शिक्षण घेऊन उच्चपदस्थ नोकरी करण्याचे स्वप्न बाळगलेल्या तरूण ग्रामपरिवर्तन व रचनात्मक विकासकार्याच्या यज्ञकुंडात उर्वरित आयुष्य झोकून देतो हि अतिशय विलक्षण व निर्णायक घटना आहे.स्व.बि.आर.काका,अशोक दादा नावाचे आदर्श संस्काराची ज्योत सातत्याने प्रज्वलित ठेवण्याचे फार मोठे व जबाबदारीचे कार्य त्यांच्या खाद्यावर आहे.ज्येष्ठ व्यक्तिचा आदर व कनिष्ठांना बरोबर घेऊन शिंदे कुंटुबानी निर्माण केलेल्या वलयांकित लोकसमुहाचा पसारा संभाळण्याचे अवघड कसरत धिरोदात्तपणे पार पाडली.नाना शिंदे संयमी, सुसंस्कृत्त आणि अभ्यासू वक्ते म्हणून तालुक्याला परिचित आहेत.

 राजकारणात चातुर्य ,लोकसंपर्क दुरदृष्टी,समकालीन राजकीय प्रवाहाचा अभ्यास, जनतेचा कल या सर्वाचा मेळ बसवावा लागतो.समकालीन नेत्यांशी कधी चुचकारून तर कधी सख्य धरून तर कधी मौन बाळगून तर कधी हळूच बगल देऊन स्वत:चा सामर्थशाली आयाम उभा करणे गरजेचे असते. अर्थात नानाजी कडे असणाऱ्या धुर्त व धोरणी निर्णय क्षमते द्वारे विरोधकांना नामोहरम करून त्यांचा कार्यक्रम घडवून आणण्यात हातखंडा आहे.

दादाच्या पश्चात आलेली जबाबदारी यशस्वीपणे नानांजीनी पार केली.लोकनेते पंतगराव कदम,जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, सांगली बाजार समितीचे सभापती स्वर्गिय अशोक दादा

यांच्या विचार पुढे चालवित,आमदार मोहनराव कदम,कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व आमदार विक्रमसिंह दादा सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर असलेली कॉंग्रेस कार्याध्यक्षाची जबाबदारी यशस्वी पेलत राजकारणातील उल्लेखनीय कार्य ते करत आहेत.सध्या त्यांच्या पत्नी गायत्रीदेवी शिंदे या जत नगरपरिषदेत यशस्वीपणे काम करत आहेत. राजकारणातील चांगुलपण व लोकहितवादी काम हे त्यांच्या कार्याचे गमक आहे.

त्यांनी कॉग्रेसच्या विचाराला रुजविण्याचे काम केले आहे.

डफळापूर येथे जनसंपर्क कार्यालय काढून ते पश्चिम  मनमिळावू,सामान्य जनतेची दाखल्या पासून व्यक्तिगत सुख दु:खात धावुन जाणातात. त्यामुळे जनतेचा गोतावळा त्यांच्या जवळ कायम असतो.अशा नानाजीचा आज वाढदिवस त्यांना दिर्घाआयुष्य लाभो ह्याच शुभेच्छा.

मधुर वाणी असलेले जनतेचे आपले नानाजी

जत तालुक्यात समाजहितासाठी काम करणारे सुजय उर्फ नाना शिंदे यांनी आपल्या मधुर वाणीने जत सह तालुक्यात कार्यकर्ते,पदाधिकारी वयोवृद्ध,महिलाच्यात लोकप्रिय आहेत.युवकांचे ऑयडॉल आहेत.

शंब्दाकन : महादेव अंदानी,गुगवाड

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here