रस्ते कामाचा दर्जा घसरला | कोरोनाचा फायदा,अधिकारी बेफिकीर ; ठेकेदार सुसाट

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या रस्ते कामाचा दर्जा घसरला असून कोरोनामुळे अडकलेली कामे पावसाळ्या अगोदर पुर्ण करण्याच्या घाई गडबडीत केलेले रस्ते महिन्या भरातच उखडू लागले आहेत.एकीकडे ठेकेदारांकडून सुरू असलेल्या या उद्योगाकडून सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे.

जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन कार्यालये कार्यरत आहेत.दोन्ही कार्यालयाकडे स्वतंत्र विभागीय अधिकारी,अभिंयत्याची फौज काम करते.गत वर्षभरात तालुक्यातील रस्ते कामासाठी शेकडो कोटीचा निधी आला आहे.सर्व काही तडजोडीने गतीने सुरू असलेल्या या कामाला कोरोनाचा ब्रेक लागला होता.दीड महिन्यानंतर शासन आदेशानुसार पुन्हा रस्त्याची कामे सुरू झाली आहेत.

पावसाळ्या आगोदर सुरू असलेल्या या कामाचा दर्जा नुसता घसरलाच नाही.तर खडीकरणाचा थर मुरमीकरणा सारखा बनला आहे.अनेक रस्ते महिन्याभरातच उखडले आहेत.रोलीन नसल्याने अनेक रस्त्यावर चड्डे वाहनधारकांच्या पाठीची वाट लावत आहेत.गेल्या पंधरवड्यात नव्याने केलेले रस्तेही बऱ्याच ठिकाणी उखडले आहेत. रस्ते निकृष्ट होत असताना त्यावर कारवाई करण्याचे धाडस अधिकारी दाखवू शकत नाहीत. डोळ्य़ांना सार्‍या गोष्टी दिसत असतानाही अधिकारी गप्प कसे बसतात, असा प्रश्न भाबड्या नागरिकांना पडतो. दुसरीकडे बेरक्या नागरिकांना मात्र हा खाबूगिरीचा उद्योग माहीत असल्याने त्यांना प्रश्नच पडत नाही. खाबूगिरीचे ढग दाटणे आणि त्यातून टक्केवारीचा पाऊस पडणे या गोष्टी आता नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यामुळेच शहरासह तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार रस्त्यांपासून वंचित रहावे लागत आहे.जत तालुक्यातील अगदी पुर्वी पासून खराब रस्ते माथी मारले आहेत. नव्याने आलेल्या सरकार व तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील अनेक रस्त्याचे कामे झाली आहेत. मात्र कामे करताना दर्जा न राखल्याने नव्याने केलेल्या रस्त्यावरलही नव़्याने खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.अच्छे रस्ते काही दिवसापुरर्तेच राहिल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे.अशा निकृष्ठ कामाबद्दल  प्रशासनाकडून नेमकी काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  1. जत तालुक्यात नव्याने सुरू असलेला हा रस्ता पुढे काम चालू असतानाच मागे उखडला आहे.नव्या रस्त्यावर सुरू असलेले दर्जाहिन काम

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.