तहसीलदारावर पाळत ठेवणाऱ्या दोघांना अटक

0
1

जत,प्रतिनिधी : जत शहरातील  तहसिलदार सचिन पाटील यांच्या निवास स्थानाबाहेर संशयास्पद उभ्या असलेल्या चारचाकी गाडीसह दोघांना जत पोलिसांच्या गस्तपथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या स्कॉर्पिओ (एम. एच. 10, सीए. 4951) या गाडीतून धारदार कोयता व तलवार अशी शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. बुधवारी दि. 29 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत जत पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई केरबा चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दादासाहेब नामदेव हिप्परकर (रा. सिंगनहळ्ळी, ता. जत) व पप्पू उर्फ संतोष हरी कांबळे (रा. विठ्ठल नगर, जत) या दोघा संशयित संशयितांना ताब्यात घेतले आहे.गाडीतील धारदार शस्त्रे, चारचाकी गाडी जप्त केली आहेत. संशयित दोघांवर बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक विजय वीर करत आहेत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here