जत,प्रतिनिधी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘दारू नको दुध प्या’ या उपक्रमातून 31 डिसेंबरच्या रात्री युवक नेते विक्रम ढोणे यांच्या वतीने व्यसनमुक्तीचा नारा देण्यात आला. यामध्ये सुमारे 250 जतकरांनी दुधाचा आस्वाद घेतला.यावेळी तहसीलदार सचिन पाटील,पो.नि.आर.आर.शेळके,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष,महेश शरणार्थे,उपाध्यक्ष नवनाथ संकपाळ,दिगंबर सांवत,पि.एम.
वाघमोडे,दिनकर पंतगे,राजू आरळी,बंटी दुधाळ,अनिल मदने,योगेश एडके,प्रकाश मोटे,विलास काळे उपस्थित होते.यावेळी बोलताना पोलिस आर.आर.शेळके म्हणाले, की दारू पिणे मानवी आरोग्यास खूपच धोकादायक असून दारूमुळे सातत्याने गुन्हे घडत आहेत.ही गोष्ट चिंताजनक आहे. 31 डिसेंबर म्हटले की,तरुण युवा वर्ग दारू पिऊन जुन्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असतात.मात्र त्यांच्या व्यसनामुळे अपघात,वाद-विवाद घडतात.त्यातून नको ते घडते.परिणामी त्यांचे संपूर्ण कुंटूंब अडचणीत येते. त्यासाठी स्त्रीने दारूमुक्तीसाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे.ढोणे यांच्या वतीने 31 जानेवारी रात्री शिवाजी चौक परिसरात रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांना दूध वाटप करत ‘नववर्षांचे स्वागत दारू पिऊन नको’, असा संदेश दिला.