अनैतिक संबधाच्या संशयावरून मुलीचा वडिलाकडून खून | अंकले येथील घटना

0

जत,प्रतिनिधी :अंकले ता.जत येथील अल्पवयीन मुलीचे गावातील एका मुलाबरोबर अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून जन्मदात्या बापाकडून खून करण्यात आला.घटना जागृत्ती बाबासाहेब यमगर वय- 17 असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी बाप बाबासाहेब तुकाराम यमगर वय 42 यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

Rate Card

पोलीसांनी दिलेली माहिती अशी, जागृत्ती हिचे गावातील एका मुलाबरोबर अनैतिक संबध होते.यांची माहिती वडील बाबासाहेब यमगर यांना कळाले होते.बाबासाहेब यांनी मुलीला हे संबध तोड म्हणून अनेकवेळा सांगितले होते.तरीही जागृत्ती त्या मुलांशी संपर्कात असल्याचा संशय वडील बाबासाहेब यांना आला होता.यातून सोमवारी मध्यरात्री मुलगी जागृत्तीस मारहाण केली.त्यात तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने बेशुध्द पडली.त्यांनतर भानावर आलेल्या वडीलांनी चारचाकी  गाडीचे मालक दादासो लक्ष्मण पुजारी यांना बोलविले.त्यांनी जखमी जागृत्तीस कवटेमहांळ येथे रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.मात्र तिचा वाटेत मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.डॉक्टरांनी कळविल्यावरून कवटेमहांळ पोलीसांना कळविले.कवटेमहाकांळ पोलीसांनी मृत्तदेहाचा पंचनामा करून 0 नंबरने जत पोलीसांना गुन्हा वर्ग केला आहे. अधिक तपास सा.पोलिस निरिक्षक आप्पासाहेब कत्ते करत आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.