शेगावनजिकचा धोकादायक खड्डा मुजवा

0
12

शेगाव,वार्ताहर : जत ते सांगोला राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणा धोकादायक खड्डा मुजवावा अशी मागणी होत आहे.

जत – सांगोला मार्गाचे काम सुरू आहे.जे थे काम सुरू नाही,तेथे खड्ड्याचे साम्राज्य आहे.शेगावजवळच्या ओढापात्रात असाच एक जीवघेणा सुमारे तीन फुट खोल खड्डा कुणाचा जीव घेईल सांगता येत नाही,अशी स्थितीत आहे.शेगावपासून सांगोलाला जाणाऱ्या मार्गावरील ओढापात्रा नजिकच्या या खड्ड्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे. रिमझिम पाऊस झाल्यास खड्ड्याचे डबके बनून धोका निर्माण होत आहे. जत-सांगोला,सोलापुरला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने दररोज शेकडो वाहने या मार्गावरून जा-ये करतात.येथे केंद्रीय सडक महामार्गाकडून या रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटचे काम सुरू आहे. मात्र अत्यंत संथ सुरू असलेल्या कामामुळे मुख्य रस्ताही दुरूस्ती करता येत नाही अशी स्थिती आहे.सध्या काम सुरू नसलेल्या रस्त्यावर खड्डे धोकादायक बनत आहेत.संबधित ठेकेदार कंपनीकडून हे खड्डे तातडीने मुजवावेत अशी मागणी आहे.

शेगावनजिकचा धोकादायक बनलेला खड्डा 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here