अन्न औषध विभागाचा कारभार सुधारा : सचिन मदने

0

  

जत : जत शहरासह तालुक्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे.या विभागाचे अधिकारी व कर्मचारी तालुक्यात फिरत नाहीत,अशी तक्रार युवासेनेचे नेते सचिन मदने यांनी केली. त्यांनी याबाबतचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना दिले,अन्न व औषध विभागाचा कारभार सुधारला नाही,तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मदने यांनी दिला आहे

निवेदनात म्हटले आहे की,जत शहरासह तालुक्यात दुध,फिल्टर पाण्यासह सह खाद्यान्न भेसळीचे पदार्थ सर्रास बाजारामध्ये विकले जातात. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.याकडे अन्नभेसळ विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

Rate Card

शहरात मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पाणी विकले जाते, याकडे ही या विभागाचा कानाडोळा करीत आहेत.नगरपालिका अशुद्ध पाणीपुरवठा करीत आहे, वेळेवर पाणी मिळत नाही त्यामुळे शहरात मिनरल वाटर विक्रेत्यांची चलती आहे.या पाणी शुद्धीकरण केंद्रावर कोणाचेही नियंत्रण नाही.त्याच्या पाण्याची तपासणी होत नाही,मिनरल वॉटर म्हणून कोणत्या स्वरूपाचे पाणी लोकांना विकले जात आहे ते समजत नाही.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आली आहे,शहरात हातगाड्यांवर उघड्यावर पदार्थांची विक्री सुरू आहे या या पदार्थांची तपासणी केव्हा झालेली दिसत नाही या हात गाड्यावर उघड्या पदार्थांची विक्री सुरू आहे त्याचीही तपासणी या विभागाने लवकरच करावी वारंवार तक्रार करूनही या विभागाकडून याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.

जत : शहरातील खाद्यान्नातील भेसळ रोका या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.