डफळापूरात आरोग्य विभागाचे सर्व्हेशन सुरू | 4 तापाचे रुग्ण सापडले

0
6

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील गावभागात आलेल्या डेंगूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून सर्व्हेशन सुरू करण्यात आले.यात  तापाचे 4 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित चोथे यांनी दिली.यापुर्वीचे डेंगूसदृष्य तापाचे रुग्णाचीही प्रकृती स्थिर असून आम्ही लक्ष ठेवून असल्याचेही डॉ.चोथे यांनी सांगितले.

सोमवारी सुमारे 4 हजार घराचा सर्व्हे करण्यात आला.रक्ताचे नुमनेही घेण्यात आले आहेत.डफळापूर गाव भागात गेल्या पंधवड्यात पडलेल्या पावसामुळे डांसाचे थैमान माजले होते.यामुळे डेंगूच्या साथीचा फैलाव झाला होता.आजपर्यत पंधरावर रुग्णांना डेंगूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.त्या पार्श्वभूमीवर डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व्हेशन सुरू करण्यात आले आहे.येत्या दोन-तीन दिवसात गावातील सर्व घरातील रुग्णांची तपासणी करणार आहोत. डांस प्रतिबंधित औषधे टाकणे,साठविलेल्या पाण्याची स्वच्छता करणे,गप्पी मासे सोडणे अशा सुविधा आम्ही करत आहोत.ताप,थंडी वाजून येणे अशा रुग्णांनी तात्काळ केंद्रात दाखवावे असेही आवाहन डॉ.चोथे यांनी केले.

डफळापूर ता.जत येथे डेंगूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागच्या पथकाकडून सर्व्हेशन सुरू करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here