नुकसानग्रस्त पिकांचे गतीने पंचनामे करा | आ.विक्रमसिंह सांवत : पंचनाम्याची मुदत वाढवा,प्रमुख अधिकाऱ्यासोबत घेतला आढावा

0

जत : तालुक्यात गेल्या पंधवरड्यात झालेल्या पाऊसामुळे द्राक्ष,डांळीबसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत,व शासनाकडून मदतीसाठी प्रस्ताव पाठवावेत असे आदेश आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिले.

Rate Card

जत येथील तहसील कार्यालयात महसूलसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आ.सांवत यांनी घेतली.तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे.सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांना सर्वाधिक फटका बसला आहे.अन्यही पिके पिंकाचे नुकसान झाले आहे.या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बागाचे आ.सांवत यांनी प्रत्यक्ष जात पाहणी केली.त्यानंतर दुपारी प्रशासनाची बैठक घेत प्रत्येक मंडनिहान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे मुदतीच्या आत पंचनामे करा,कोणत्याही किचकट अटी न लावता सरसकट पंचनामे करावे असेही यावेळी सांवत यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले.जतचे तहसिदार सचिन पाटील,जतचे गट विकास अधिकारी ए.ए.धरणगुत्तेकर,जिल्हा परिषदेचे सदस्य महादेव पाटील,माजी सभापती बाबासाहेब कोडग,तालूका कृषी अधिकारी मेडीदार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

मुदत वाढवून द्या

जत तालुक्याचा मोठा विस्तार आहे.तालुक्यातील जवळपास नव्वद टक्के भागाला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.शासनाच्या मुदतीत पंचनामे करणे शक्य नसल्याने मुदत वाढवून द्यावी अशी मागणी सांवत यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.

जत येथील बैठकीत बोलताना विक्रमसिंह सांवत तहसीलदार सचिन पाटील,बिडिओ धरणगुतीकर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.