अवकाळीचा फटका बसलेल्या बागाची आ.सांवत यांच्याकडून पाहणी

0
6

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील दोन महिन्यापुर्वी दुष्काळ व आता अवकाळी पावसाचा आणि शासनाच्या दुर्लक्षाचा मार एकाच वेळी झेलणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी दिले.सांवत यांनी जत तालुक्यातील द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झालेल्या उमदी परिसरातील शेतकऱ्यांच्या बागाची पाहणी केली.द्राक्षबागांची उमदी परिसरात गेले होते.

यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला.त्यांच्या सोबत कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जत तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष अाप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग,जत तालुका कृषी अधिकारी श्री.मेडीदार,गट विकास अधिकारी श्री. धरणगुत्ती,विस्तार अधिकारी श्री.संकपाळ,मंडळ अधिकारी श्री. चव्हाण सोबत होते. ग्रा.प.उपसरपंच रमेश हलके,वहाब मुल्ला,सुरेश कोहळी,बंडू शेवाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

उमदी ता.जत येथील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी करताना आमदार विक्रमसिंह सांवत व अधिकारी


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here