समाजातील चुकीच्या गोष्टीवर प्रकाशझोत टाकून त्यांत काही अंशी परिवर्तनाची दीप पेटविण्याचे काम समाजातील सर्वच वृत्त माध्यमातून सतत होत असते.हे करताना काही समाजातील दुष्ट विचार संपवावेत असा तर्क असतो.मात्र आताचे युवक,त्यांना पाठिशी घालणारे काही राजकीय हस्ती खरचं यातून कधी बोध घेणार… असे वारवांर म्हणावे लागत आहे.
काही चुकीच्या वाटेल चाललेले युवक,तरूण किंवा समाजातील बिघाड होणाऱ्या विकृत्ती विरोधात वृत्त माध्यमातून आक्रमक विषय मांडला तर काहीना ठेच लागते.मात्र या विषयाच्या पाठीमागील मांडणीचा विचार बाजूला पडतो.व त्यात चुकीचे काही मांडले आहे, यांचाच उहापोह केला जातो.त्यातून मग काही गोष्टी सलफ्यावर गेलेल्या युवक,तरूणांना खुमखुमी येते.अनेक वेळा गैरकृत्य करूनही सहीसलामत सुटल्याच्या आर्विभावात त्यांना आकाश ठेनगे वाटते.ते कशाही पध्दतीने पुढे मार्गक्रमन करत राजकीय मंडळी,समाज व स्व:तालाही घातक बनतात.मात्र अशा घटना आपल्या आयुष्याला वेगळे वळण लागू शकते,म्हणून यातून बोध घेऊन सुधारणारे युवक, तरूण आताच्या घडीला बोटावर मोजण्याएवढे आहेत.याला कारणीभूत आहे,आताची राजकीय चढाओढ आपल्यापासून हे तरूण बाजूला जातील म्हणून अनेकवेळा त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न राजकीय मंडळीकडून होतो.त्यामुळे लगाम नसलेले तरूण आई-वडीलाच्या वेदना,प्रतिष्ठा सोडून चुकीच्या वाटेने पळतात.पळून पळून,गंभीर थेच लागल्यानंतर त्यांना आपण चुकतोय यांचा साक्षात्कार होतो.तोपर्यत वेळ आपले काम करून पुढे गेलेली असते.त्यानंतरचे जीवन जगण्याचे औदार्य प्रत्यक्षात अनुभवानंतर कळते.असो काही तरूणाच्या खुमखुमीला यामुळे आवर बसवा एवढ्यासाठी हा लेखच प्रंपच…!