जागतिक बुध्दीबंळ पटातील जतची खेळाडू : श्रेया हिप्परगी

0
2

श्रेया हिप्परगी, संख येथील जिल्हा परिषद मराठी शाळे मधील इयत्ता 4 ची विद्यार्थिनी आहे. संख हे एक जत सारख्या अति दुर्गम आणि दुष्काळी तालुक्यातील एक छोटे गाव आहे. अशा ठिकाणच्या छोट्या गावातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीने अहमदाबाद येथे पार पडलेल्या 9 वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.या स्पर्धेमध्ये निवड होण्यासाठी तिने राज्य पातळीवर झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत सर्व सामने जिंकून तिने प्रथम क्रमांक मिळवला होता.गुजरात मधील अहमदाबाद येथे 3 ते 11 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून 163 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला 11 सामने खेळावे लागतात. या 11 सामान्य मधून श्रेयाने 9 गुण मिळवत संपूर्ण भारतामधून तृतीय क्रमांक पटकाविला. या कामगिरीमुळे तिची आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या 11 सामान्या मधून तिला फक्त एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.उर्वरित सामन्यात तिने 8 विजय व 2 सामने बरोबरीत सोडवून एकूण 9 गुण प्राप्त केले. यामध्ये तिने वर्ल्ड स्कूल चॅम्पियन असणारी श्रियाना मल्ल्या हिला सुद्धा पराभवाचा धक्का दिला. या स्पर्धेत सर्वोच्च स्थानी असलेल्या तीन हि खेळाडूंना समान 9 गुण मिळाल्या कारणाने स्पर्धेतील रेटिंग नुसार प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक ठरविण्यात आले.त्यानुसार श्रेयाला तृतीय क्रमांक मिळाला.कोणतेही प्रायोगिक तालमी शिवाय श्रेयाने केलेली हि कामगिरी जत तालुक्यासाठी कौतुकास्पद व अभिमानाची आहे.श्रेया ही ग्रामीण भागात राहत असल्याने तिला विशेष प्रशिक्षणाची सोय उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे आर.बी.पी.हायस्कूल संख मध्ये शिक्षक असणारे तिचे वडील गुरु हिप्परगी हेच तिच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत.स्पर्धेचा तयारीसाठी श्रेया व तिचे वडील दररोज पहाटे 4 वाजता उठून मोबाईल वरील जागतिक दर्जाच्या  बुद्धिबळ खेळाडूंच्या चालींचा अभ्यास करून या स्पर्धेसाठी तयारी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हताश न होता उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर केल्यास यश मिळतेच.असा मोलाचा संदेश श्रेयाने मिळविलेल्या यशातून मिळतो. याद्वारे ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा मिळते.देशांतर्गत विविध स्पर्धेच्या ठिकाणी नेण्याचे तसेच स्पर्धेच्या तयारीसाठी गृहिणी असणाऱ्या तिच्या मात्रोश्री आशाराणी या सुद्धा मोलाची मदत करीत आहेत.2018 मध्ये 8 वर्ष वयोगट मध्ये थायलंड येथे झालेल्या आशियाई युथ चेस चॅम्पियन स्पर्धे मध्ये ब्लिडझ प्रकारात रौप्य व रॅपिड प्रकारात कास्य पदक मिळविले आहे. तिने स्पेन येथे झालेल्या 8 वर्ष वयोगट मध्ये जागतिक स्पर्धेत 14 वा क्रमांक प्राप्त केला होता.  आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा खर्च हा लाखाच्या घरात असतो. थायलंड आणि स्पेन येथे पार पडलेल्या स्पर्धेसाठी श्रेयाचा खर्च जरी शासकीय कोट्यातून होत असला तरी हि तिच्या लहान वयामुळे पालकांना हि तिच्या बरोबर प्रवास करावा लागतो.पालकांचा खर्च सरकारी कोट्यामधून होत नसल्या कारणामुळे जवळपास 5 लाख रुपयांचा खर्च कुटुंबाला झाला आहे.आता निवड झालेल्या आशियायी स्पर्धेसाठी पुन्हा लाखो रुपयांचा खर्च होणार आहे. जत मधील ‘युथ फॉर जत’ सारख्या शिक्षणाला वाहिलेल्या सेवाभावी संस्थेने आता पर्यंत श्रेयाला 2 वेळा आर्थिक मदत केली आहे.त्याचबरोबर तिची अहमदाबाद येथे राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली आहे परंतु त्यांच्या हि मदतीला मर्यादा आहेत. त्यामुळे प्रतिभावंत खेळाडू आर्थिक कारणाने स्पर्धेत सहभागी होण्यापासून वंचित राहू नये यासाठी व्यावसायिक कंपनी, दानशूर व्यक्तींनी आर्थिक पाठबळ द्यावे, तिचे प्रायोजकत्व स्वीकारावे अशी कळकळीची इच्छा तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

रियाज जमादार,संख

जतची जागतिक स्पर्धेत जमकलेली श्रेया हिप्परगी पारितोषिक स्विकारताना


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here