डफळापूर | अभिजीत चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा |

0
Rate Card

डफळापूर, वार्ताहर : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजीत दादा चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. दुष्काळ व सांगली,कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.वाढदिवसानिमित्त अभिजित चव्हाण यांना दिवसभर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. बुधवार सकाळ पासून चव्हाण यांनी त्यांच्या डफळापूर येथील जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छा स्विकारल्या.जत पश्चिम भागातील कॉग्रेसचे युवक नेते म्हणून चव्हाण याचा मोठा प्रभाव आहे.त्यामुळे जत पश्चिम भागातील अनेक पदाधिकारी, मान्यवर,युवकांनी अभिजीत दादांना प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा दिल्या.सायकांळी कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी निलेश बामणे,दिग्विजय चव्हाण, बाळासाहेब चव्हाण,गणेश गिड्डे,देवदास पाटील, सलीम पाच्छापूर,चंद्रशेखर वठारे,संजय सुर्यवंशी,किशोर पाटील,अमित नदाफ,विजय संकपाळ,सुरज महाजन,हर्षवर्धन चव्हाण,सुशांत चव्हाण, पप्पू पाटील,रणजीत भोसले, आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

दीड हजार वह्याचे वाटप डफळापूर येथील जि.प.च्या दोन प्राथमिक शाळा,राजे विजयसिंह डफळे हायस्कूलमधील सर्व विद्यार्थांना वह्या वाटप करण्यात आल्या.त्यांचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.

बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना जिल्हा बँक विक्रमसिंह सांवत व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.