जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीचे लिपिक प्रमोद सावळेराम भालचीन यांच्या पत्नी रेश्मा भालचीन(वय 27) यांनी राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केली.घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडली.याबाबत त्याचे पती प्रमोद भालचीन यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.
जत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, जत पंचायत समितीला पुणे जिल्हातील जून्नर तालुक्यातील रहिवाशी असलेले प्रमोद भालचीन हे जत पंचायत समितीत लिपीक म्हणून कार्यरत आहेत.पत्नी,सहा वर्षाच्या मुलीसह ते पंचायत समितीच्या कर्मचारी निवासस्थानात राहत होते.मात्र दोन महिन्यापुर्वी तेथे एका कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्याने ते पत्नीसह मोरे कॉलनी येथे भाड्याने घर घेऊन राहत होते.नेहमीप्रमाणे शुक्रवारी प्रमोद भालचीन हे पंचायत समितीत नोकरीवर आले.तर पत्नी रेश्मा ह्या सकाळी आपल्या मुलीला जतमधील शाळेत सोडून घरी गेल्या होत्या.
सायकांळी पाच वाजता मुलीची शाळा सुटल्यानंतर रेश्मा मुलीला आणण्यासाठी जात होत्या, मात्र शुक्रवारी त्या गेल्या नाहीत.त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी तिचे वडील प्रमोद यांना फोन केला.त्यांनी शाळेत जाऊन मुलीला घेत घरी गेले. घराचा दरवाज्या बंद होता.पत्नी रेश्माला हाक मारूनही आतून प्रतिसाद आला नाही.त्यामुळे त्यांनी पाठीमागील दरवाज्यातून आत बघितले असता पत्नी रेश्मा मयत अवस्थेत दिसली. पत्नीने बेडरूममधील हुकाला साडीने गळपास लावून आत्महत्या केल्याचे लक्षात आले.तातडीने त्यांनी पोलीसांना माहिती दिली.पोलीसांनी पंचनामा करून जत ग्रामीण रुग्णालयात मृत्तदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.मात्र गेल्या दोन महिन्यात पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या पाठी लागलेले ग्रहण सुटायचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पोलीस फौजदार पवार करत आहेत.