जत | अन्न भेसळच्या एका अधिकाऱ्याला 5 लाखाचा हप्ता ? | कारवाई केलेला अनेकजण साहेबाचा एंजन्ट |

0
2

जतेतील पेंड विक्रेत्याच्या गोडवूनमध्ये तडजोड

जत,प्रतिनिधी:दुध भेसळ रोकण्यासाठी असणारा अन्न भेसळच्या एका अधिकाऱ्याला तालुक्यातील दुध संघाकडून महिन्याला पाच लाख रूपयाचा हप्ता दिला जात असल्याची चर्चा असून तालुक्यात उत्पादनापेक्षा जास्त दुध संकलन होत आहे.तालुक्यात दुधातील भेसळीने सर्व सिमा पार केल्या आहेत.फँट वाढविण्यासाठी सर्रास स्टार्च पावडरचा वापर केला जात आहे. तर अनेक ठिकाणी स्टार्च पावडर,तेल,दुधाचे मिश्रण ढवळून बनावट दुध तयार करण्याचा राजरोस धंदा सुरू आहे.अन्नभेसळच्या अधिकाऱ्यांचे एंजन्ट तालुकाभर विस्तारले आहेत.त्यामुळे तालुक्यात होणाऱ्या अनेक कारवायात तडजोडीने प्रकरण मिटविले जात आहे.तालुक्यातील प्रकरण मिटविण्यासाठी एका दुध संघाचा मालक व जत शहरातील पेंडविक्रेता एंजन्ट आहे. त्यांच्या गोडावूनमध्ये तडजोडीची रक्कम एंजन्टाकरवी ठरवून प्रकरण मिटविण्यात येत असल्याची चर्चा आहे.प्रत्येक प्रकरणात तडजोडीचा आकडा लाखवर असल्याची चर्चा आहे.जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा दुय्यम व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली.त्याला गेल्या काही वर्षापुर्वी व्यवसायिक स्वरूप आले.त्यामुळे तालुकाभर दुध संकलन केंद्रे,दुध डेअऱ्या झपाट्याने वाढल्या.डेअरीतील स्पर्धा व शासनाच्या धोरणामुळे दराची स्पर्धा सिगेला पोहचली.मापाने विक्री होणारे दुध फँटवर विक्री होऊ लागले.जादा फँटच्या दुधाला चांगला दर मिळू लागला.यातूनच मिसळीला गती आली.फँट वाढविण्यासाठी सोडा,साखर मिसळण्याएतपत मर्यादित असलेली भेसळ दुध संघात उच्च शिक्षित कर्मचाऱ्यामुळे विषारी भेसळ सुरु झाली.युरिया,तेल,स्टार्च पावडर अशा भयानक भेसळीने घातक दुध निर्माण होऊ लागले.त्यापलिकडे जात दुध संघ,अन्न भेसळच्या भष्ट्र अधिकाऱ्यांच्या साखळीने बनावट दुध तयार करण्याला बंळ मिळत गेले.आता हेच बनावट दुध अनेकांना कँन्सर,पोटाच्या विकाराने त्रस्त करत आहेत.जत तालुक्यात दुष्काळाने जनावरे कमी होत असताना दुध संकलन वाढत असल्याने भेसळीचे वास्तव समोर येत आहे.सर्वाधिक भेसळ दुध व दुग्धजन्य पदार्थ होत आहे.नुसती भेसळ नाहीतर कारवाई होत नसल़्याने किंवा मँनेज प्रक्रियेमुळे भेसळखोराची ताकद वाढली असून भेसळीचा प्रकार थेट केमिकल वापरून दुध तयार करण्यार्यत पोहचला आहे.पुण्यापासून ते देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपर्यंत दूध पुरविणार्‍या जत तालुक्यातील दूध भेसळीची खोलवर पाळेमुळे रोवलेली आहेत. विशेष म्हणजे, सांगलीच्या अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरात ठिकठिकाणी छापे टाकून शेकडो दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी किती नमुन्यात भेसळीचे दूध आढळले हे गुलदस्त्यात आले.यामुळे कारवाईतच ‘भेसळ’ असल्याची चर्चा सुरू आहे.  जिल्ह्यात दूध भेसळीचे प्रमाण वाढते आहे. छोट्या-मोठ्या दूध संकलन केंद्रांसह अनेक प्लॅन्टमालक यात सराईत आहेत. विशेषतः जत तालुका हा दूध भेसळीचा अड्डा बनल्याचे अनेकदा समोर आले आहे. याशिवाय जिल्ह्याबरोबरच तालुक्यांतही दूध भेसळीच्या माफियांचे पाळेमुळे रोवलेली आहेत.  शेतकर्‍यांच्या दुधात वेगवेगळी अत्याधुनिक रसायने, तसेच तेल, सोडा, निरमा, युरिया,स्टार्च पावडर इत्यादी मानवी आरोग्यास हानीकारक असलेले घटक मिश्रित करून कृत्रिम दूधनिर्मिती करण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. यात सामान्य शेतकरी नाहक बदनाम होत असला, तरी पडद्यामागे मात्र दूध संकलन केंद्र चालक व प्लॅन्टमालक, तसेच अन्नभेसळचे अधिकारीच खरे सूत्रधार आहेत. त्यांच्यामधील ‘कागदी’ साखळी ‘वर‘पर्यंत पोहोचल्याने दुधात भेसळ करणार्‍या एकाही अपराध्याला अद्याप कडक शिक्षा होऊ शकली नाही.अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकले. या ‘कागदी’ कारवाईत संबंधित अनेक ठिकाणांहून दुधाचे नमुने घेऊन पुढील कार्यवाहीसाठी  पुणेकडे पाठविण्यात आले होते. अन्न भेसळ कायद्यानुसार 14 दिवसांत या नमुन्याची तपासणी होऊन त्याचा अहवाल पाठविण्याची तरतूद आहे.  त्यामुळे सर्रास भेसळ करणार्‍या दूध संकलन केंद्रचालक व प्लॅन्टमालकांना नमुने बदलून ‘क्लिनचिट’, तर दिली जात नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

अन्न भेसळच्या अधिकाऱ्यांचे तालुकाभर एंजन्टदुध भेसळ रोकण्यासाठी जतच्या कामगिरीवर असलेल्या एका अधिकाऱ्यांच्या कारवाया चर्चेचा विषय बनल्या आहेत.कारवाईनंतर रितसर कारवाई करूनही प्रकरण मिटविण्यात येते.त्यात 1 लाखापासून 2.30 लाखावर मागणी होते.कारवाई झालेल्या दुध संघ चालकापैंकी बंहुताश हे या अधिकाऱ्यांचे खबऱ्या म्हणून काम करत असल्याची चर्चा आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here