डॉ.चौथे कर्तव्यदक्ष अधिकारी, अन्यायकारक कारवाई करू नका : ग्रामपंचायतीची मागणी

0
1

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कृतव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चौथे यांची कोणतीही चुक नसल्याने अन्यायकारक कारवाई करू नये या मागणीचे निवेदन डफळापूर ग्रामपंंचायतीच्या वतीने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,डॉ.चौथे यांनी महिलेच्या क्रिटिकल परिस्थिती असल्याने रुग्णवाहिका बोलविली होती.तरी ही महिलेच्या पतीने तिला महिलेचा विरोध असताना अर्धा किलोमीटर चालवत नेहले.त्यातच महिलेची परिस्थिती अजून बिकट होऊन बसस्थानकात प्रस्तूती झाली होती.प्रत्यक्षात डॉ.चौथे यांच्या कर्मचाऱ्यांनी महिला व तिच्या जुळ्याची काळजी घेतली.तिला केंद्रात आणून चांगला उपचार दिला आहे. महिलेचीही डॉ.चौथे यांच्या विरोधात कोणतीही तक्रार नाही.त्यामुळे चौविस तास मुक्कामी राहून डफळापूर सह परिसरातील रुग्णाची काळजी घेणाऱ्या व जिल्ह्यात प्रस्तूती नंबर वन बनविलेल्या केंद्राच्या डॉ.चौथेवर अन्यायकारक कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली.यावेळी पशूराम चव्हाण सर,तानाजी चव्हाण, माधवराव पाटील,सदाशिव शांत उपस्थित होते.

डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अभिजीत चौथे यांच्यावर अन्यायकारक कारवाई करू नये या मागणीचे सीईओना निवेदन देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here