जत | तालुकाभर पत्त्यांचा डाव! | तिन पत्तीच्या जुगाराचा खेळ; लाखोची उलाढाल:पुर्व भागात प्रमाण मोठे

0

जत,(का.प्रतिनिधी) जत तालुक्यात बंदी आदेश झूगारून तीन पानी व अन्य खेळ जुगाराच्या माध्यमातून लाखो रूपयांची उलाढाल होत असून गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत पद्धतीच्या नावावर गावागावांत हा जुगार सर्रास खेळल्या जात आहे.
जुगाराच्या माध्यमातून अनेक जण आपली जमा पुंजी डावावर हारतात तर काही भाग्यवान जिंकतात. वर्षानुवर्षे हा प्रकार वाढत असून, यामध्ये आता तरुणवर्गाने प्रेवश घेतल्यामुळे तरुण वर्गाचे शिक्षण व व्यवसायातील लक्ष विचलीत होत आहे.या जुगारामध्ये लहान पासून थोरापर्यंत तर गरीबांपासून श्रीमंताचाही समावेश असतो. बहुतांश पुरूष मंडळी जुगाराच्या डावावर कमाई घेवून किस्मत आजमावतात. जुगारामध्ये मोजक्याच लोकांना नसीबाची साथ मिळते तर अनेकांना कंगाल होण्याची पाळी येते. जुगार खेळणार्‍यांमध्ये काही नवखी मंडळीही आपला शौक पूर्ण करून घेतायतं. ज्यांना पत्त्याची आवड आहे असे दर्दी लोक अगदी व्याजाने पैसे काढून खेळतात.काही गावात पोलिसाच्या भितीने आडोशाना असे खेळ सुरू आहेत.
जुगारासाठी काही हौसी मंडळी व्यवसायिक दृष्टिकोन समोर ठेवून विशेष कल्बचे आयोजन करतात. यासाठी एखाद्या शेतात किंवा घरात जुगाराच्या साहित्यासह खाणे,पिण्याची सर्व सोय यथेच्छ केली जाते आहे. यासाठी कार्यक्रमाचे आयोजक प्रत्येक डावामधून भाडे वसूल करतात. त्यातून त्यांना हजारो रूपयांची न खेळता कमाई होते. बर्‍याचवेळा भाडे काढणारे आयोजक जुगारात हारणार्‍यांना व्याजाने पैसे देवून दुप्पट कमाई करून घेतात.पोलिसाची सर्व जबाबदारी आयोजकावर असते.
खेडोपाडी रंगणार्‍या या जुगारांची कल्पना पोलिसांनाही असते. मात्र आयोजकांचे खबरे जागोजागी पेरलेले असल्यामुळे जुगाराबाबत पोलिसांना कानोकान खबर मिळू देत नाही. गेल्या किती वर्षापासून काही जेष्ट मंडळी सोबत तरुण मंडळी तालुक्यात अनेक गावात ठिकठिकाणी तिनपत्ती, एक्का बादशाह, रमी सारख्या जुगार खेळण्यात येत आहेत.
काही गावांमध्ये पत्ते खेळण्याची प्रथा आहे. गावागावांमध्ये सर्रास पत्ते खेळण्यात येतात. जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये मैदानात, पारावर, खुल्या जागेत तडव, चटई टाकून सर्रास पत्ते खेळण्यात येत होते. तसेच लहान मुलांचाही समावेश असल्याचे उघडकीस येत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.