डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथे टंचाईतून तलावात पिण्यासाठी सोडलेले पाणी उपसाबंदी असतानाही बेकादेशीपणे मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे 70 शेतकऱ्याकंडून पाणी उपसा सुरू आहे.त्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी याच्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डफळापूरात गेल्या महिन्याभरापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती.तलाव पुर्णपणे आटल्याने नागरिकांना पाणी सोडता सोडता येत नव्हते.त्यामुळे ग्रामपंचायतीने एकतर म्हैसाळ योजनेतून तलावात पाणी सोडा,अन्यथा टँकर सुरू करा अशी मागणी पंचायत समिती व जत तहसील कार्यालयाकडे मागणी केली होती.त्यामुळे डफळापूर तलावात गेल्या आठवड्यात टंचाईतून पिण्यासाठी म्हणून पाणी सोडले आहे.तेच पाणी योजनेतून ग्रामस्थांना सोडले जात आहे.मात्र सध्या तलावातून पाणी उपसण्यास बंदी आहे.तरीही सुमारे 70 शेतकऱ्यांकडून पाणी उपसा होत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तलावात मोटारी टाकल्या जात आहेत. परिणामी तलावातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या तलावात नागरिकांना पाणी साठा शिल्लक आहे. तेही पाणी शेतकऱ्यांनी उचलल्यास पुन्हा पाणी टंचाई निर्माण होणार आहे.त्यामुळे प्रशासनाने संबधित शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.