जत,प्रतिनिधी : जत महसूल विभागातील वाळू तस्करी दंड प्रकरणाचे गुढ वाढत असून महसूल विभागातील आठ वाहनधारकांसह दोन कर्मचाऱ्याचे नाव तपासात निष्पन्न झाले असून एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.बिपिन मुगळीकर असे ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून लक्ष्मण भंवर यांनी अटकपुर्व साठी प्रयत्न सुरू केले आहेत.अटकेतील पाच जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दंड प्रकरणातील गुन्हा दाखल राजकुमार सांवत,शफिक शेख,नागेश पांढरे,संतोष पाथरूट,दादासाहेब हिप्परकर यांच्या विरोधात जत तर किरण बेंळूखी,संतोष पाथरूट,अरूण बिराजदार यांच्या विरोधात उमदी पोलीसात दाखल झाला आहे.यातील पाच जणांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मुगळीकर व भंवर या कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत.
शासन,जत महसूल विभागाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.तर महसूल प्रशासनातील लिपिक व कर्मचाऱ्यांच्याकडे दंडाची रक्कम दिली होती.त्यांनीच बोगस चलन शिक्का मारून दिल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे नेमका काय गफला आहे.हे योग्य तपासानंतर समोर येणार आहे. त्याअगोदर अन्य काही घडामोडी होऊन पडदा पडण्याची शक्यता नाकाराता येत नाही.मात्र यानिमित्ताने महसूल विभाग व वाळू तस्करीच्या चर्चेला ऊत आला आहे.अन्य काही कर्मचारी पोलीसाच्या रडारवर असल्याचीही चर्चा सुरू आहे.