संख/जत I सरकारला निवडणूकीत धडा शिकवा : खा.राजू शेट्टी | विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ संखात सभा |

0

संख/जत,प्रतिनिधी : सत्ता येताच आश्वासनाचा विसर पडलेल्या भाजपा सरकाराचा घडा भरला आहे.पाच वर्षात शेतकरी,मजूरांची फसवणूक केली आहे.त्यामुळे सरकारला या निवडणूकीत धडा शिकवा प्रतिपादन खा राजू शेट्टी यांनी केले, 

 जत तालुक्यातील संख येथे स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.यावेळी विक्रम सावंत,उमाजीराव सनमडीकर,महेश खराडे,सुरेशराव शिंदे,रमेश पाटील,डॉ.भाऊसाहेब पवार,संदीप राजोबा, भुपेंद्र कांबळे, सुजयनाना शिंदे,बसवराज धोडमनी,आप्पाराय बिराजदार,महादेव पाटील, बाबासो कोडग,कुंडलिक दुधाळ,आप्पा मसाळ,उत्तम चव्हाण, मुन्ना पखाली,नागेश शिळीन,बिरादार,रेबगोंड आदी उपस्थित होते

खा शेट्टी पुढे म्हणाले,भारतीय जनता पक्षासोबत 2014 ला मी युती केली,त्यावेळी मला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची हमी दिली होती.पण सत्ता येताच त्यांना दिलेल्या वचनाचा विसर पडला.मी लोकसभेत नेहमीच कर्ज माफी मागितली होती.शेतीला शाश्वत पाणी व हमीभाव द्यावा या तीनच अटी घातल्या होत्या. त्यांनी स्वामीनाथन आयोग, राष्ट्रीय दुष्काळ आयोगा करण्याची तयारी दाखवली होती.मात्र गेल्या पाच वर्षात शेतकरी हिताच्या धोरणाला त्यांनी बगल दिली.केवळ खोटी वचने देऊन फसवणूक केली आहे.स्व,वसंतदादा पाटील यांनी म्हैसाळ योजना जन्माला घातली,आता विशाल पाटील आणि मी दोघे मिळून याचा कळस चढवू यासाठी विशाल पाटील यांना खासदार करा.मी राजकारणापेक्षा कामाला महत्व देणारा कार्यकर्ता आहे, तुबची योजना पूर्ण करणे सोयीचे होते.पण भाजपा सरकारने जाणीवपूर्वक ही योजना आडवून ठेवली.अन्य योजनाचीही हि अवस्था आहे.त्यामुळे गाजर दाखवून मते घेणाऱ्या मोदी सरकारला हिसका दाखवण्याची वेळ आली आहे.त्यांना सत्तेवरून खाली उतरवा असे शेवटी शेट्टी म्हणाले.

Rate Card

महेश खराडे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी लढणारी ही संघटना आहे, जतच्या पूर्व भागाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आपण विशाल पाटील यांच्या मागे उभे राहावे.

बसवराज दोडमनी,आप्पाराया बिरादार, कुंडलिक दुधाळ,भुपेंद्र कांबळे यांची भाषणे झाली.

संख ता.जत येथील प्रचार सभेत बोलताना खा.राजू शेट्टी व्यासपिठावर विक्रम सांवत,माजी आमदार उमाजीराव सनमडीकर  आदी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.