तासगाव : शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळाणाऱ्यांना मते मागताना शरम तरी कशी नाटक नाही,भाजवाल्यांचा सत्तेचा माज जनता उतरवेल असा घणाघाती टिका राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे केली.स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची बाजार समितीच्या बेदाणा हॉलमध्ये सभा झाली. यावेळी पवार बोलत होते.
पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतलेली सभा माझे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यांना कायम आमच्या पक्षाची चिंता पडलेली असते.परंतू ज्यांना घर नाही.घर करायचे व सांभाळायचे माहिती नाही त्यांनी माझ्या घराची आणि पक्षाची चिंता करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तासगावात प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकर्यांना साले म्हणतात. प्रवक्ते अवधूत वाघ आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना लावारिस म्हणतात. पिकवणारा जगला नाही, तर खायला काही मिळणार नाही. खाणार्याच्या भल्यासाठी पिकवणाराचं भलं केलं पाहिजे. मतांचा जोगवा मागत आहेत. मात्र शेतकर्यांचा जो भलं करणार नाही, त्याला दारात उभं केलं जाणार नाही, अशी टीका यावेळी पवार यांनी भाजप सरकारवर केली.
मोदी यांनी राज्यात घेतलेल्या सभांमध्ये माझ्यावर टीका केली. कधी घरात भांडण आहे म्हणतात. कधी राष्ट्रवादीची सत्ता माझ्या हातातून गेली आहे, असे म्हणतात. याचा मला तोटा होण्याऐवजी फायदाच होत आहे. मोदींच्या टीकेमुळे ऐन निवडणुकीच्या काळात माझी बिनपैशाची जाहिरात होत आहे.असेही शेवटी पवार म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजप नेत्यांना अबजलखानाची फौज म्हणणारे आणि चौकीदार चोर है म्हणणारे उध्दव ठाकरे भाजपच्या वळचणीला का गेले ? याचे उत्तर त्यांनी द्यावे. चार वर्षातील उध्दव ठाकरेंची भाषणे आणि सामनातील अग्रलेख याचा विचार केला तर, खर काय आणि खोटं काय? हा प्रश्न पडतो. उध्दव ठाकरेेंचं हे वागणं बाळासाहेबांचा मुलगा म्हणुन शोभणार नाही.
तासगाव येथील सभेत बोलताना जेष्ठ नेते शरद पवार व मान्यवर