वाळू तस्करीतील दंड प्रकरण : वाहन मालकावरचं बुमरँग | जतेत 5 तर उमदीत 3 जणावर गुन्हा दाखल |

0

तिघे ताब्यात,फसवणूक,अपहार केल्याचा ठपका

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात वाळू तस्करीतील बोगस चलन प्रकरणाचे बुमरँग होत वाळू तस्करीतील वाहन मालकांवर उलटले असून शासनाची फसवणूक,बोगस चलन,व प्रशासनाची बदनामी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.जत तहसील कार्यालयाने दंड केलेल्या गाड्याच्या दंडापोटी 14 लाख 48 हाजार 825 रूपयाची फसवणूक प्रकरणी 5 जणावर तर संख अप्पर तहसील कार्यालयाकडील 11 लाख 42 हाजार 225  रूपयाच्या अपहारप्रकरणी तिघा वाहन धारकावर उमदी पोलीसात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.राजकुमार रावसाहेब सावंत (निगडी खुर्द), शफिक बाबुमिया शेख (जत), ज्ञानेश चंदर पांढरे, संतोष शंकर पाथरूट (जत) व दादासाहेब नामदेव हिप्परकर अशा पाच जणांविरोधात जत पोलिस ठाण्यात तर किरण ज्योत्याप्पा बेळुंखी, संतोष शंकर पाथरूट, अरूण शंकर बिराजदार रा जत या तिघांविरोधात उमदी पोलिस ठाण्यात 420,465, 463,468,471,34 आदी कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

यातील तिघांना पोलीसांनी अटक केली आहे. तहसीलदार सचिन पाटील यांनी जतेत तर लिपीक सोपान बागल यांनी उमदी पोलीसात फिर्याद दिली.

Rate Card

अधिक माहिती अशी, जत तहसील कार्यालयाने वाळू तस्करी करताना पकडलेल्या वाहनाची दंडाची रक्कम

बोगस चलनावर स्टेट बँकेचा खोटा शिक्का मारून शासनाची 14 लाख 48 हजार 825  रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. 

      दरम्यान, उमदी पोलिस ठाण्यात अशाच गुन्ह्या प्रकरणी तिघा वाहनधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर 11 लाख 42 हजार 225 रूपयांची शासनाची फसवणूक करून अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ही फिर्याद लिपिक सोपान बागल यांनी दिली आहे.जत तालुक्यात अवैध वाळू तस्करी प्रकरणी पाच वाहनावर कारवाई करण्यात आली होती. दि.15 जानेवारी ते 13 मार्च दरम्यान वरील संशयित आरोपींनी शासकीय चलनावर स्टेट बँकचा बोगस शिक्का उटवून शासनाची सुमारे 26 लाख रूपयांची फसवणूक केली आहे. तसेच पैसे शासनाच्या खात्यात भरल्याचा न भरता बोगस कागदपत्रांद्वारे जत तहसिल कडील कारवाईतील वाहने सोडवून नेली आहेत.या प्रकरणात सशयिंतानी अधिकारी,कर्मचारी व शासनाची फसवणूक केली असून याबाबत जत पोलिस ठाण्यात वरिल संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल माने व उमदीचे कोळेकर करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.